राज्यातील शाळांची निश्चितीसाठी सगुण विकास कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:40 PM2019-09-18T12:40:45+5:302019-09-18T12:41:34+5:30
शाळांची निश्चितीसाठी शिक्षण विभागाच्यावतीने सगुण विकास कार्यक्रम(ट्युनिंग आॅफ स्कूल) राबविण्यात येणार आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: राज्यातील प्रत्येक केंद्रामधून किमान दोन शाळांमध्ये ट्युनिंग जुळविण्यासाठी अर्थात शाळा सिद्धीमध्ये ए ग्रेड प्राप्त शाळेने दुसºया कमकुवत शाळेची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून सगुण विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
राज्यातील शाळांची निश्चितीसाठी शिक्षण विभागाच्यावतीने सगुण विकास कार्यक्रम(ट्युनिंग आॅफ स्कूल) राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली दोन महिन्यांपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये गतवर्षीप्रमाणे यंदासुद्धा सगुण विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाद्वारे शाळांना एकमेकांकडून शिकण्यासाठी ट्युनिंग आॅफ स्कूल कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक केंद्रामधून किमान दोन शाळांमध्ये ट्युनिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार प्रत्येक केंद्रातील शाळा सिद्धीमध्ये ए ग्रेड प्राप्त असणाºया शाळांपैकी एक शाळा जी इतर शाळांना सहकार्य किंवा गुणवत्ता वाढविण्यासाठी भागिदारी करेल. ही शाळा निवडण्याची जबाबदारी संबंधित केंद्र प्रमुखांना पार पाडावी लागणार आहे. अशा दोन शाळांची माहिती केंद्र प्रमुखांकडून भरून घेण्याची जबाबदारी जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे राहणार आहे.
ट्युनिंग आॅफ स्कूल कार्यक्रम कागदावरच!
गतवर्षीसुद्धा हा कार्यक्रम राबविण्यात आला होता; परंतु यातून कोणतीही फलनिष्पत्ती झाली नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळा सिद्धीमध्ये ए ग्रेड प्राप्त शाळेकडून दुसºया शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. जेही प्रयत्न झाले, ते केवळ कागदावरच झाले. प्रत्यक्षात ट्युनिंग आॅफ स्कूल कार्यक्रमानुसार शाळांचे ट्युनिंग जुळलेले दिसून आलेच नाही. त्यामुळे यंदासुद्धा हा कार्यक्रम कागदावरच दर्शविल्या जाण्याची शक्यता आहे.