जिल्ह्यात १३ तूर खरेदी केंद्रं सुरू!
By ram.deshpande | Published: July 26, 2017 01:45 AM2017-07-26T01:45:12+5:302017-07-26T01:47:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सहकार व पणन विभागाच्या २१ जुलै २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकºयांनी तूर खरेदी केंद्रावर ३१ मे २०१७ पर्यंत तूर विक्रीबाबत नोंद केलेली आहे, अशा शेतकºयांची तूर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत ३१ जुलैपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात १३ तूर खरेदी केंद्र संबंधित तालुक्याच्या कृषी बाजार समितीमध्ये सुरू करण्यात आलेली आहेत. या तूर खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी करण्यात येत आहे; तूर खरेदी करण्यासाठी आवश्यक सहकार्य व योगदान देण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे. ३१ मे २०१७ पूर्वी तुरीची नोंदणी केलेल्या शेतकºयांनी संबंधित तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजार समितीमध्ये तूर विक्रीस आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत २५ जुलै २०१७ रोजी जिल्ह्यात बुलडाणा तूर खरेदी केंद्रावर ६ शेतकºयांची १५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, तसेच मोताळा येथील केंद्रावर १० शेतकºयांची १५० क्विंटल, मलकापूर येथे २० शेतकºयांची ५०० क्विंटल, नांदुरा येथे ७ शेतकºयांची ७0, जळगाव जामोद येथे ७ शेतकºयांची १०० क्विंटल, संग्रामपूर येथे ३ शेतकºयांची ६०, शेगाव येथे ३५ शेतकºयांची ४५०, खामगाव येथे ८ शेतकºयांची १०१ क्विंटल, चिखली येथील केंद्रावर २ शेतकºयांची २०, मेहकर येथे २ शेतकºयांची ५० क्विंटल, दे.राजा येथे ५ शेतकºयांची ४०, सिं. राजा येथे २ शेतकºयांची १५ क्विंटल आणि लोणार येथील खरेदी केंद्रावर ७ शेतकºयांची १५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ११४ शेतकºयांची १८५६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.
दक्षता घेऊनच शेतमाल आणावा- जालिंदर बुधवत
बुलडाणा येथील कृउबासमध्ये शेतकºयांची शासकीय तूर खरेदी पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. शेतकºयांनी शेतमाला ओला होणार नाही, याची दक्षता घेऊन बाजार समितीत तूर आणावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांनी केले आहे. बुलडाणा बाजार समितीत तूर खरेदी सुरु करताना सहायक निबंधक बुलडाणा सांगळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी शिंगणे, बुलडाणा बाजार समितीचे सभापती जालींधर बुधवत, बाजार समितीचे सचिव वनिता साबळे, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष नंदु खडके, बाजार समितीचे संचालक बबन खरे, प्रभाकर काळवाघे उपस्थित होते. ज्या शेतकºयांची शिल्लक राहिलेली तूर विक्रीकरिता बुलडाणा बाजार समितीमध्ये नाव नोंदणी केली आहे. त्या शेतकºयांनी सन २०१६-१७ चा सातबारा, पेरेपत्रक, आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स तसेच आपला शेतमाल पावसामुळे ओला होणार नाही, याची दक्षता घेऊनच प्रथम बुलडाणा बाजार समितीमध्ये कागदपत्रे तपासणीकरिता घेऊन येणे त्यानुसार आपल्याला तूर मोजणीकरिता दूरध्वनी फोनद्वारे बोलाविण्यात येईल. जेणे करुन आपल्या शेतमालाचे त्याच दिवशी मोजमाप होईल, याची नोंद घ्यावी व समितीस सहकार्य करावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा सचिव यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.