तुरीने गाठला सात हजारांचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 11:44 AM2021-04-11T11:44:28+5:302021-04-11T11:44:37+5:30
Khamgaon APMC News : गुरूवारी बाजार समितीत तुरीला ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : अतिवृष्टीमुळे तूर पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, तुरीचे दर वाढत चालले आहे. गुरूवारी बाजार समितीत तुरीला ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
ज्या शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक करून ठेवली होती, त्या शेतकºयांना चांगला भाव मिळत आहे. खरिपात अतिवृष्टी झाल्याने तूर पिकाला फटका बसला. त्याचबरोबर उत्पादन घटले. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये तुरीची आवकही घटली. आवक कमी झाली आणि मागणी वाढली की, दरात वाढ होते, या अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे बाजार समित्यांत तुरीच्या दरात वाढ झाली. सरुवातीला ४ हजार रुपये क्विंटल असणाºया तुरीने आता ७ हजारांचा टप्पा गाठला आहे.
गुरूवारी बाजार समितीत जास्तीतजास्त दर ७ हजार रुपये. कमीतकमी ६ हजार रुपये होते. तर सर्वसाधारण दर ६६०० रुपये प्रतिक्विंटल होता. तुरीची साठवणूक करून ठेवलेल्या शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा होणार आहे.
मागील काही दिवसांपासून आवक कमी असल्याने ही दरवाढ होत आहे. चांगल्या दर्जाच्या तुरीला ७१०० भाव मिळत आहे.
- केशव चौधरी,
व्यापारी