शासकीय खरेदीसाठी तुरीची नाेंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:13+5:302020-12-30T04:44:13+5:30
तूर नोंदणीकरिता शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा ऑनलाइन पीक पेरासह दाखला, बँक पासबुकची आधार लिंक केलेली छायांकित प्रत, मोबाइल क्रमांक ...
तूर नोंदणीकरिता शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा ऑनलाइन पीक पेरासह दाखला, बँक पासबुकची आधार लिंक केलेली छायांकित प्रत, मोबाइल क्रमांक आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्यामध्ये बुलडाणा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर, शेगाव, संग्रामपूर, मोताळा, सुलतानपूर केंद्र, साखरखेर्डा, सिंदखेड राजा येथील खरेदी केंद्रांवर तुरीची खरेदी होणार आहे. त्यासाठी शेतकरी नोंदणी सुरू झालेली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित खरेदी केंद्रांवर जाऊन तूर खरेदीकरिता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे. सध्या तूर काढण्याचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तुरीवरही या पावसाचा परिणाम झालेला आहे. थंडी व धुके पडल्याने एकरी उत्पादनातही घट येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा तुरीला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे हमीभावासाठी नोंदणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.