१२ गावांनी काेराेनाच्या दाेन्ही लाटा थाेपविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:14+5:302021-06-17T04:24:14+5:30
ओमप्रकाश देवकर मेहकर : काेराेनाची दुसरी लाट शहरांपेक्षा ग्रामीण भागातच जास्त पसरली हाेती. अनेक गावांमध्ये काेराेनाचे रुग्ण वाढले हाेते, ...
ओमप्रकाश देवकर
मेहकर : काेराेनाची दुसरी लाट शहरांपेक्षा ग्रामीण भागातच जास्त पसरली हाेती. अनेक गावांमध्ये काेराेनाचे रुग्ण वाढले हाेते, तसेच अनेकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मेहकर तालुक्यातील १२ गावांनी काेराेनाच्या दाेन्ही लाटा यशस्वीपणे थाेपविल्या आहेत. या गावांमध्ये दाेन्ही लाटांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही, तसेच पहिल्या लाटेत तालुक्यातील ४४ गावांनी काेराेनाला वेशीवरच राेखले हाेते.
मेहकर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, प्रशासनाने नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग सॅनिटायझर व मास्कचा वापर करणे, अनावश्यक गर्दी टाळणे यांचा वापर करणे नागरिकावर बंधनकारक केले होते. सुरुवातीच्या काळात मेहकर तालुक्यामध्ये डाेणगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील गावामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले होते. याकरिता मेहकर तालुक्यातील महसूल विभाग, पंचायत समिती, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, गाव पातळीवरील ग्रामदक्षता समिती यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे सुरू केले. पहिला लाटेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव साखरशा, जानेफळ, कळंबेश्वर, देऊळगाव माळी व डोणगाव मिळून ४४ गावे ही कोरोनामुक्त होती. यात दुसरा लाटेमध्ये १३ गावे कोरोनामुक्त होती़ दोन्ही लाटांमध्ये कोरनामुक्त गावांची संख्या ही १२ होती. सदर गावे कोरनामुक्त ठेवण्यासाठी गावचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्यसेवक, आशा वर्कर, अंगणवाडीसेविका यांनी योग्य ते नियोजन केल्याने कोणाला रोखता आले.
आदिवासी भागात काेराेना राेखण्यात यश
देऊळगाव साकर्शा व जानेफळ या भागातील आदिवासीबहुल गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळाले असून, प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करणे सुरू आहे. या गावांमध्ये नियमांचे पालन करण्यात आल्याने काेराेनाचा प्रादुर्भाव झाला नाही.
काेट
मेहकर तालुक्यातील सर्व विभागांनी आपली जबाबदारी चोखपणे सांभाळल्यामुळे मेहकर तालुक्यातील एकूण १२ गावांमध्ये कोरोनाला बाहेरच रोखण्यात यश मिळाले आहे. यापुढेही प्रशासनाच्या नियमाची अंमलबजावणी सुरूच ठेवण्यात येणार आहे.
- आशिष पवार, गटविकास अधिकारी, मेहकर
दाेन्ही लाटांमध्ये काेराेनामुक्त असलेली गावे
काेराेनाची पहिली आणि दुसरी लाट वडाळी, मोहना बु., टेंभुरखेड, नागेशवाडी, बारडा व मेळजानोरी, वागदेव, नेमतापूर, मोसंबेवाडी, खानापूर, हिवरखेड, सुळा, बदनापूर या गावांनी थाेपविली़. आराेग्य, महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनाने राबविलेल्या उपाययाेजनांमुळे या गावांमध्ये एकही रुग्ण पाॅझिटिव्ह आलेला नाही.
पहिल्या लाटेत काेराेनामुक्त असलेली गावे
पहिल्या लाटेत वडाळी, मोहना बुद्रुक, टेंभुरखेड, नागेशवाडी, बारडा, मेळजानोरी, नेमतापूर, मुंदेफळ, पारडी, मोसंबीवाडी, साब्रा, खानापूर, फरदापूर, शेंदला, भालेगाव, कंबरखेड, गोंढाळा, मोळी, लावणा, शहापूर, उमरा, हिवरखेड, मोहखेड, माळखेड वर्दडा, लोणी, सुळका, बदनापूर, शेलगाव काकडे, उसरण, सुभानपूर, मोहदरी, घोरदडा, अंत्री देशमुख, पारडा, कोयाळी सास्ते, शिवपुरी, जयताळा, सारंगपूर, वर्दडी वैराळ, नांद्रा, सावंगी माळी, सांगीवीर, कळप विहीर या गावांनी काेराेनाला वेशीवरच राेखले हाेते. दुसऱ्या लाटेत १३ गावांनी काेराेना राेखला आहे.