दोनशे लाभार्थ्यांना मोबदला नाही
By Admin | Published: April 24, 2015 01:33 AM2015-04-24T01:33:09+5:302015-04-24T01:33:09+5:30
राष्ट्रीय महामार्ग ६ चे चौपदरीकरण; मलकापूरातील काही लाभार्थ्यांंना मिळाला लाभ; अनेकांच्या पदरी निराशा.
मलकापूर (जि. बुलडाणा): राष्ट्रीय महामार्ग ६ चे चौपदरीकरण होणार मात्र ज्यांच्या जमिनी त्यात गेल्या त्या शेतकरी व व्यावसायीकांच्या समस्या मात्र कायम आहेत. मलकापूर शहराच्या हद्दितील सुमारे दोनशेवर शेतकरी व व्यावसायिक अजूनही मोबदल्यापासून वंचित असल्याची माहिती असून महसूल विभागाच्या सुत्रांनी त्यास दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे सदरचा निधी उपलब्ध असल्याच सांगितल जात आहे. मागील काही वर्षापूर्वी शासनाच्या वतीने नागपूर धुळे ह्या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणास सुरुवात केली. अमरावती-नागपूर काम झाल्यानंतर अमरावती-धुळे ह्या दरम्यानच्या कामाची प्रक्रिया सुरु झाली. त्यात अमरावती विभागात फक्त मलकापूर - नांदुरा ह्या दोन तालुक्यातील शेतकरी व व्यावसायीकांना मोबदला देतांना अन्यायकारक वागणूक मिळाल्याने त्यावेळी एकच खळबळ उडाली. विद्यमान पालकमंत्री ना एकनाथराव खडसे, आमदार चैनसुख संचेती, तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रसादराव जाधव यांनी आपआपल्या परीने शेतकरी व व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा केल्याने शासनाचा निधी उपलब्ध झाला व शेतकरी आणि व्यावसायिकांचा जीव भांड्यात पडला. प्राप्त माहितीनुसार मलकापूर ग्रामीणच्या हद्दितील मोबदल्याची वाटप झाली आहे. मात्र मलकापूर शहराच्या हद्दितील सुमारे २00 वर शेतकरी व व्यावसायीकांची जमिनीच्या मोबदल्याची प्रतीक्षा कायम आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी दिनेशचंद्र वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी औपचारीकता पूर्ण झाल्यावर मलकापूर तालुक्यात ग्रामीण भागात भूसं पादनाच्या मोबदल्यातील अनुदान वाटप केले असल्याचे सांगून उर्वरित लाभा र्थ्यांचा, मे महिन्याच्या अखेरीस त्या सर्वांंना मोबदला देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.