सव्वा लाख शेतकर्‍यांना मिळणार लाभ

By admin | Published: July 19, 2014 12:28 AM2014-07-19T00:28:30+5:302014-07-19T00:54:14+5:30

कृषी संजीवनी योजना : बुलडाणा जिल्ह्यातील १५ उपविभागात अंमलबजावणी.

Twenty-three lakh farmers benefit | सव्वा लाख शेतकर्‍यांना मिळणार लाभ

सव्वा लाख शेतकर्‍यांना मिळणार लाभ

Next

बुलडाणा : दुष्काळ, अतवृष्टी व गारपिटीसारख्या अस्मानी आपत्तींमुळे उदध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी वीज बिलांच्या थकबाकीत सवलत देणारी ह्यकृषी संजीवनी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५ उपविभागातील १ लाख ३0 हजार ७५ शेतकर्‍यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. यामुळे शेतीपंपाच्या थकीत वीज देयकातील व्याज व विलंब आकारामध्ये सवलत मिळणार आहे.
या योजनेतंर्गत कृषी ग्राहकांना ३१ मार्च २0१४ पयर्ंतच्या थकबाकीतील मूळ रकमेतून ५0 टक्के सवलत मिळणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना थकबाकीच्या मूळ रकमेची ५0 टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरावी लागणार आहे. पहिला हप्ता किमान २0 टक्के ३१ ऑगस्टपयर्ंत, दुसरा हप्ता कमीत कमी २0 टक्के ३0 सप्टेंबरपयर्ंत आणि उरलेली रक्कम ३१ ऑक्टोबरपयर्ंत भरायची आहे.
कर्जमाफी व व्याजमाफीसारख्या योजनांचा नेहमी थकबाकीदारांना फायदा होतो. मात्र, नियमितपणे वीज बिल व कर्ज भरणार्‍यांना कोणताच फायदा होत नाही. ही बाब कृषी संजीवनी योजनेत सवलत देताना लक्षात घेण्यात आली आहे. त्यामुळे ३१ मार्च रोजी कृषिपंपाची कुठलीही थकबाकी नाही त्या शेतकर्‍यांना पुढील सहा महिने ५0 टक्केच बिल भरावे लागणार असून ५0 टक्के रक्कम सरकार भरणार आहे.
विज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता कि शोर शेगोकार यांनी या योजनेमुळे शेतकर्‍यांवरील थकबाकीचा बोजा कमी होईल तसेच थकबाकीची वसूली सुद्धा होईल, असे सांगून शेतकर्‍यांनी मार्च २0१४ चे पुर्ण वीज बिल संबधीत विज वितरणाच्या उपविभागीय कार्यालयात भरुन योजनेचा लाभ घेण्याचे अहवान केले आहे.

उपविभाग            लाभार्थी
बुलडाणा            ६९९३
चिखली             १३४२६
देऊळगावराजा     ९0१४
धाड                  ७८0२
जळगाव जा        ९0२७
खामगाव(शहर)     ६४३
खामगाव(ग्रामीण)  १३0९३
लोणार                ७९६७
मलकापूर            ६८६३
मेहकर              १0६0६
मोताळा             ११३५९
नांदुरा                 ८७८१
संग्रामपूर             ८७0५
शेगाव                 २३२१
सिंदखेडराजा        १२४७५

Web Title: Twenty-three lakh farmers benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.