जातीची बंधने झुगारुन जुळल्या रेशीमगाठी!

By admin | Published: February 14, 2017 12:27 AM2017-02-14T00:27:02+5:302017-02-14T00:27:02+5:30

एक वर्षात २0७ आंतरजातीय प्रेमविवाह.

Twisted sex with silk! | जातीची बंधने झुगारुन जुळल्या रेशीमगाठी!

जातीची बंधने झुगारुन जुळल्या रेशीमगाठी!

Next

बुलडाणा, दि. १३- प्रेमात फुलांबरोबर येणारे काटे हे प्रेमवीरांना नेहमीच बोचणारे असतात. कुटूंबाकडून होणारा विरोध आणि जातीची तेढ निर्माण करुन प्रेमाला आवर घालण्याचा प्रयत्न जालीम जमाना करतो. मात्र, या जातीच्या बंधनाला झुगारुन तेरा महिन्यात जिल्ह्यात २0७ आंतरजातीय प्रेमीजोडपी विवाहाच्या रेशीमगाठीत बांधल्या गेले.
एकमेकांशी प्रेम करणारे कधीच जगाची पर्वा करीत नाही. पण कुटुंबाचा व समाजाचा विरोध व रोष त्यांच्या पाचवीला पुजलेला असतो. सोबत जगण्याच्या आणाभाका घेऊनही प्रेमात यश मिळाले नाही, तर बर्‍याच वेळा युवक-युवतींनी मृत्यूला कवटाळले, अशा घटना बर्‍याच घडल्या आहेत. या गोष्टीमुळे समाज ढवळून निघाला खरा, मात्र समाजाची मानसिकता बदलली नाही. समाजाची मानसिकता बदलून जातीय तिढा सुटावा, विविध धर्माच्या संस्कृतीचा मिलाप व्हावा, यासाठी शासनाने सुद्धा २0१0 नंतर आंतरजातीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या आहे. मात्र तरीही प्रेमी युगुलाकडे पाहण्याची समाजाची वक्रदृष्टी तीळमात्रही बदलली नाही.
या जातीच्या बंधनाला झुगारुन जिल्ह्यात २0१६-२0१७ मध्ये २0७ आंतरजातीय युगुल विवाहाच्या रेशीमगाठीत अडकले. यात २0१६ मध्ये जानेवारी महिन्यात १५, फेब्रुवारी १0, मार्चमध्ये ३0, एप्रिल २५, मे महिन्या २0, जून १0, जुलै ५, ऑगस्ट मध्ये १८, सप्टेंबर १५, ऑक्टोबर १६, नोब्हेंबर २५, डिसेंबर महिन्यात ७ आणि जानेवारी २0१७ मध्ये १0 अशी आंतरजातीय प्रेमीयुगुलांनी विवाहासाठी नोंदणी केली.

प्रोत्साहन रकमेत तीन लाखांनी वाढ
आंतरजातीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने २0१0 नंतर विविध नवीन योजना अंमलात आणल्या. यात आंतरजातीय विवाह झाल्यानंतर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. या योजनेंतर्गत जोडप्यांना ५0 हजार रुपयांचा धनादेश दिला जातो. शिवाय त्यांना कायद्याचे संरक्षण मिळते. २0१६ नंतर शासनाने अशा आंतरजातीय विवाहित जोडप्यांना मिळणार्‍या प्रोत्साहन रकमेत तीन लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

Web Title: Twisted sex with silk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.