दोन फरार आरोपींना अटक
By admin | Published: March 5, 2017 02:01 AM2017-03-05T02:01:37+5:302017-03-05T02:01:37+5:30
गुन्हे शाखेने फरार असलेल्या दोन आरोपींना शुक्रवारी अटक केली.
बुलडाणा, दि. ४- जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमधील बर्याच गुन्ह्यांमध्ये हवे असलेले आरोपी फरार असल्याने कोर्टाच्या कामकाजामध्ये व्यत्यय येऊन कोर्टाचे निकालावर परिणाम होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने फरार असलेल्या दोन आरोपींना शुक्रवारी अटक केली.
बुलडाणा जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपीतांचे शोध कामी पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, अपर पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी यांच्यासह वेगवेगळी विशेष पथके तयार केली. या स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने फरार आरोपींचा शोध घेऊन पो.स्टे.दे.राजा येथील अप.क्र. ७१/२0१४ कलम ४२0, ४0६, १२0, (ब), ३४ सहकलम ३ एमपीआयडी मधील पाहिजे असलेले आरोपी सर्जेराव तुकाराम भुतेकर रा.आळंद अधिक एक यांना ३ मार्च रोजी ताब्यात घेऊन त्यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीकरीता पो.स्टे.चे ताब्यात दिले.