खामगावात मोरपंखांची विक्री करणा-या दोघांना पकडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:12 AM2017-07-27T02:12:31+5:302017-07-27T02:14:14+5:30

खामगाव : शहरात सर्रासपणे मोरपंखाची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर वन विभागाने दोन जणांना मोरपंखाची विक्री करताना रंगेहात पकडले.

two arrest for saling peacock feathers | खामगावात मोरपंखांची विक्री करणा-या दोघांना पकडले!

खामगावात मोरपंखांची विक्री करणा-या दोघांना पकडले!

Next
ठळक मुद्देशहरात मोरपंखाची विक्री होत असल्याचे उघडकीसवन विभागाने पाळत ठेवून केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरात सर्रासपणे मोरपंखाची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर वन विभागाने दोन जणांना मोरपंखाची विक्री करताना रंगेहात पकडले. बुधवारी बारादरी व जगदंबा चौकातून वनपरिक्षेत्र अधिकारी सोळंके यांनी रणजितसिंग सुजनसिंग राजकुमार व बिमलेसकुमार श्रीराजकुमार दोघे रा. उत्तर प्रदेश ह.मु. बुलडाणा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मोरपंख जप्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मोरपंखाची विक्री होत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे वन विभागाने पाळत ठेवून ही कारवाई केली.

Web Title: two arrest for saling peacock feathers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.