कर्नाटकातून मलकापूरात येणारा १ कोटी रुपयांचा गुटखा पकडला; दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:52 PM2020-05-15T17:52:33+5:302020-05-15T18:27:49+5:30

मलकापूर येथे आणण्यात येत असलेला सुमारे एक कोटी रुपयांचा  गुटखा औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला.

Two arrested in Malkapur with Rs 1 crore worth of gutkha | कर्नाटकातून मलकापूरात येणारा १ कोटी रुपयांचा गुटखा पकडला; दोघे अटकेत

कर्नाटकातून मलकापूरात येणारा १ कोटी रुपयांचा गुटखा पकडला; दोघे अटकेत

googlenewsNext

बुलडाणा: भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाºया प्लास्टीकच्या कॅरेटच्या आड छुप्या पद्धतीने कर्नाटकमधून बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आणण्यात येत असलेला सुमारे एक कोटी रुपयांचा  गुटखा औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला असून प्रकरणी मलकापुरातील दोन जणांना अटक केली आहे.
प्रत्यक्षात १४ मे रोजी रात्री औरंगाबाद येथील बीड बायपासवर झाल्टा फाट्यानजीक ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी औरंगाबाद येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने चिकलठाणा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्नाटक राज्यातून सोलापूर-अहमदनगर मार्गे औरंगाबाद बीडबायपासवरून जालन्याच्या दिशेने एमएच-२८-बी-८१३२ क्रमांकाच्या वाहनाद्वारे नेण्यात येत होता. औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर १४ मे रोजी झाल्टा फाट्यानजीक हा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील सय्यद, अकिल सय्यद अय्युब (३४, रा. सायकलपूरा) आणि शेख रफीक शेख कदीर (३५, रा. पारपेठ) यांना अटक करण्यात आली आहे. मलकापूरमधील पारपेठ भागातील पांढरी प्लॉट येथे राहणाºया अतिकूर रहेमान शफिकूर रहेमान याच्या सांगण्यावरून सोलापूरवरून जालना येथे हा गुटखा नेण्यात येत होता, असे उपरोक्त दोन्ही आरोपींनी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना तपासादरम्यान, सांगितले असल्याची माहिती आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद गुन्हे  शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

तस्करीसाठी भाजीपाल्याच्या कॅरेटचा वापर
आरोपींनी ट्रकमध्ये भाजीपाला भरण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या हिरव्या व निळ््या रंगाच्या प्लास्टीकच्या २५५ कॅरेटच्या आड ५० गोणपाटामध्ये ३०० गोण्यात हा ९० लाखांचा गुटखा ठेवला होता, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी दिली. प्रकरणी कारवाईदरम्यान हा संपूर्ण एक कोटी तीन लाख ३५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

Web Title: Two arrested in Malkapur with Rs 1 crore worth of gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.