युवकाच्या खुनप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:07 PM2019-05-04T15:07:40+5:302019-05-04T15:07:45+5:30

खामगाव शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून यातील दोघांना अटक केली आहे.

Two arrested in the murder case of the youth | युवकाच्या खुनप्रकरणी दोघांना अटक

युवकाच्या खुनप्रकरणी दोघांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी संगनमत करून २८ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. मैदानावर गुरुवारी रात्री घडली होती. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून यातील दोघांना अटक केली आहे.
विक्की राजेश हिवराळे रा. शेगाव नाका हा गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास त्याचे मित्र सोनू घाटर्डे, राहुल धेळुंदे, संदिप उर्फ मोगली सारसर तिघे रा. शंकर नगर यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते; परंतु त्यांचा मित्र त्याठिकाणी आला नाही. यावेळी उपरोक्त चौघांमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यामध्ये सोनू घाटर्डे, राहुल धेळुंदे, संदिप उर्फ मोगली सारसर यांनी संगनमत करून विक्की हिवराळे यास धारदार चाकूने पोटावर आणि पाठीवर वार करून त्याची हत्या केली. हत्येनंतर उपरोक्त तिघे घटनास्थळावरून फरार झाले. रात्री फिरायला आलेल्या काही नागरिकांना विक्की हिवराळे हा रक्ताच्या धारोळ्यात पडलेला दिसून आला. यावेळी त्यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि डिवायएसपी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व घटनास्थळावरून एक मोठा चाकू जप्त केला. याप्रकरणी मृतक विक्की हिवराळेची आत्या श्रीमती कौशल्या निरंजन शर्मा (वय ५०) रा. शेगाव नाका यांनी उपरोक्त तिघांनी भाचा विक्की याचा जुन्या भांडणाच्या कारणावरून खून केल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून तातडीने संदीप उर्फ मोगली सारसर यास अटक केली तर बुलडाणा एलसीबी पथकाने मेहकर येथून राहुल धेळूंदे यास ताब्यात घेतले आहे, तर सोनू घाटर्डे याचा शोध सुरू आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Two arrested in the murder case of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.