दोन गावठी पिस्तुलसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:16 PM2020-09-12T12:16:50+5:302020-09-12T12:17:04+5:30

मलकापूर शहर पोलीसांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून शुक्रवारी अटक केली.

Two arrested with two pistols at malkapur | दोन गावठी पिस्तुलसह दोघांना अटक

दोन गावठी पिस्तुलसह दोघांना अटक

googlenewsNext

मलकापूर: दोन लोखंडी धातुने बनलेल्या देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस विक्रीकरीता घेवून येणाऱ्या वरणगाव येथील एका तरूणासह सहकाºयास मलकापूर शहर पोलीसांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून शुक्रवारी अटक केली.
मलकापूर शहर पो.स्टे. मधील डी. बी. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना प्राप्त झालेल्या गोपनिय माहिती नुसार सागर संजय भंगाळे (वय २५) रा. सरस्वती नगर वरणगाव हा विनाक्रमांकाच्या दुचाकीने २ देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस विक्रीकरीता घेवून जात होता. या माहितीवरून पोलीसांनी बाजार समितीच्या आवारात सापळा रचला. दरम्यान सागर भंगाळे बाजार समितीच्या आवारात येताच पोलीसांनी छापा टाकुन त्यास अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ २ गावठी पिस्तुल अंदाजे किंमत १५ हजार रुपए व एक जिवंत काडतुस अंदाजे किंमत ५०० रुपए तसेच १ बिना क्रमांकाची दुचाकी असा एकुण ८० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत त्यास ताब्यात घेतले. त्यावर कलम ३,२५ शस्त्र अधिनियम कलम १३५ महाराष्ट् पोलीस अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याचा सहकारी संजय गोपाल चंदेले (वय ४५) रा. दर्यापुर गोपाल मार्केट वरणगाव याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी पिया ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तर पो.नि. कैलास नागरे यांच्या आदेशान्वये ए.पि.आय. श्रीधर गुट्टे, ए.पि.आय. चंद्रकांत ममताबादे, ए.एस.आय. रतनसिंह बोराळे, जितेंद्र सपकाळे, समाधान ठाकुर, अनिल डागोर, ईश्वर वाघ, शशिकांत शिंदे, गजानन काळवाघे, वसिम शेख, सलीम बरडे, योगेश जगताप आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई पार पाडली.

Web Title: Two arrested with two pistols at malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.