जळका भंडग येथे शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 18:52 IST2018-06-08T18:52:03+5:302018-06-08T18:52:03+5:30
खामगाव/ पि. राजा : शेतीच्या धुऱ्याच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आला. ही घटना जळका भंडग येथे दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी सांयकाळी ६ वाजेपर्यंत चौघांना अटक करण्यात आली. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
_201707279.jpg)
जळका भंडग येथे शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून
खामगाव/ पि. राजा : शेतीच्या धुऱ्याच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आला. ही घटना जळका भंडग येथे दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी सांयकाळी ६ वाजेपर्यंत चौघांना अटक करण्यात आली. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
जळका भंडग येथील फोंडे कुंटुंबियांचा त्याच्या शेता शेजारील दोन शेतकऱ्यांमध्ये धुऱ्यांवरून वाद होता. हा वाद शुक्रवारी पुन्हा उफाळून आला. दरम्यान, शेतात काम करीत असताना संतोष मारोती फोंडे (४०) यांच्यावर शेजारच्या शेतातील काही जणांनी हल्ला चढविला. भावावर हल्ला झाल्याचे निदर्शनास येताच त्यांचे भाऊ वामन मारोती फोंडे (३५) मध्यस्थी करायला गेले. मात्र, त्यांच्यावरही कुºहाड आणि काठ्यांनी जबर हल्ला करण्यात आला. त्यामुळे संतोष आणि वामन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार निखिल फटींग जळका भंडग येथे दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पिंपळगाव राजा पोलिसांनी फोंडे यांच्या शेता नजीक शेती असलेल्या दोन कुटुंबियांतील चौघांना ताब्यात घेतले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिस गावातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.