पुरात दोन बैल वाहून गेले

By admin | Published: September 2, 2014 12:35 AM2014-09-02T00:35:51+5:302014-09-02T00:35:51+5:30

सततच्या पावसामुळे नदीला पुर येवून पुलावर पाणी वाढल्याने रस्ता पार करताना निमकवळा येथील शेतकर्‍याचे दोन बैल गाडीसह ज्ञानगंगा नदीच्या पुरात वाहून गेले आहेत.

Two bulls blew in the flood | पुरात दोन बैल वाहून गेले

पुरात दोन बैल वाहून गेले

Next

खामगाव : सततच्या पावसामुळे नदीला पुर येवून पुलावर पाणी वाढल्याने रस्ता पार करताना निमकवळा येथील शेतकर्‍याचे दोन बैल गाडीसह ज्ञानगंगा नदीच्या पुरात वाहून गेले आहेत. तालुक्यातील निमकवळा येथील अशोक भारसाकळे हा शेतकरी आज १ सप्टेंबर रोजी सकाळीच नदीवर बसविलेली विद्युत मोटार पाण्यातून काढण्यासाठी बैलगाडीने चालले होते. दरम्यान निम्न ज्ञानगंगा प्रकल्पावरील पुलावर अचानक पाणी वाढल्याने बैलासह गाडी वाहून गेली. यामध्ये अशोक भारसाकळे यांनी प्रसंगावधान राखून गाडीतून उडी मारल्याने ते बचावले. मात्र त्यांचे दोन्ही बैल पाण्यात बुडाल्याने मृत्यूमुखी पडले. ऐन हंगामाच्या वेळी शेतकर्‍यांचे ६0 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे.(शहर प्रतिनिधी) पुरामुळे गावांचा संपर्क तुटला मलकापूर: तालुक्यातील मौजे हरसोडा व मौजे काळेगाव या पुर्णाकाठी वसलेल्या दोन गावांचा आज सकाळी १0 वाजेपासून संपर्क तुटल्याची माहिती गावकर्‍यांनी दिली आहे. मलकापूर तालुक्यात अजूनही पावसाची दमदार हजेरी नाही. परिणामी नळगंगा व विश्‍वगंगा या नदयांना अजुनही पूर नाही. तर पुर्णानदीच्या काठावर वसलेले हरसोडा व काळेगाव ही दोन गावे पावसाळ्यात दरवर्षी पाऊस नाही मात्र विदर्भात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने पुर्णर नदीला ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेनंतर महापूर आला आहे. पाण्याची पातळी वाढल्याने बॅकवाटर विश्‍वगंगेत आले. त्यामुळे काळेगाव प्रभावीत होवून त्या गावाचा संपर्क तुटला.तर हरसोड्यातील नाल्यात पुर्णेच्या महापुराच्या बॅकवाटरची पातळी कालपासून वाढल्याने त्या गावाचाही संपर्क तुटल्याची माहिती गावकर्‍यांनी दिली आहे.

Web Title: Two bulls blew in the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.