विहिरीत उडी घेतलेल्या मातेसह दोन अपत्यांचे वाचविले प्राण चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतलेल्या महिलेस वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:32 AM2021-02-14T04:32:42+5:302021-02-14T04:32:42+5:30

सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड हे गाव नागपूर-मुंबई महामार्गालगतच आहे. या महामार्गालगतच गावाची पाणीपुरवठ्याची विहीर आहे. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ...

Two children rescued with mother jumping into well | विहिरीत उडी घेतलेल्या मातेसह दोन अपत्यांचे वाचविले प्राण चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतलेल्या महिलेस वाचविले

विहिरीत उडी घेतलेल्या मातेसह दोन अपत्यांचे वाचविले प्राण चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतलेल्या महिलेस वाचविले

Next

सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड हे गाव नागपूर-मुंबई महामार्गालगतच आहे. या महामार्गालगतच गावाची पाणीपुरवठ्याची विहीर आहे. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी एक महिला तिच्या अपत्यांसह या विहिरीत कथितस्तरावर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी घेत असल्याचे या मार्गावरून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांनी पाहिले. त्यामुळे या दोघांनीही लगोलग त्यांची दुचाकी थांबवून विहिरीकडे धाव घेतली. लगेच उड्या मारून ३३ वर्षीय महिला व तिची तीन वर्षाची मुलगी व एक वर्षाच्या मुलालाही अन्य दोघांच्या सहकाऱ्याने विहिरीतून बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले. या तिघांनाही लगोलग स्थानिक एका खासगी रुग्णालयात उपाचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान यातील एक वर्षाच्या चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास प्रथम जालना येथे व तेथून औरंगाबाद येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच किनगावराजा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ पवार, दुय्यम ठाणेदार भाईदास माळी व अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, महिलेेने असे धाडस का केले? याबाबत मात्र स्पष्टता मिळू शकली नाही.

--यांनी वाचविले प्राण--

देऊळगावराजा येथे बाजारासाठी जात असलेले वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाकद येथील रशीद करीम कुरेशी व सोनाटी बोरी येथील अनंता वामन चनखोरे या दोघांसह विजय राजणे, राम खंदारे, सागर देशमुख यांनी विहिरीतून महिलेस तिच्या दोन मुलाना काढले. वेळीच समयसूचकता राखत या चौघांनी केलेल्या मदतीमुळे या तिघांचे प्राण वाचविण्यात यश आले. समय सूचकता दाखवत रशीद कुरेशी, अनंता चनखोरे यांनी महिलेसह तिच्या दोन अपत्यांचा जीव वाचविल्याबद्दल दुसरबीड येथील सरपंच पती प्रकाश सांगळे, उपसरपंच पती तौफिक शेख यांचा सत्कार केला.

Web Title: Two children rescued with mother jumping into well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.