जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी, ५६७ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:34 AM2021-03-17T04:34:57+5:302021-03-17T04:34:57+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरातील ७१, करडी ४, सागवन १, सुंदरखेड ४, दुधा ८, कुंबेफळ १, ढालसावंगी १, धाड ६, ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरातील ७१, करडी ४, सागवन १, सुंदरखेड ४, दुधा ८, कुंबेफळ १, ढालसावंगी १, धाड ६, वालसावंगी १, कोलवड १, उबाळखेड १, चिखली ३२, वैरागड १, खैरव २, सातगाव भुसारी १, शेलगांव जहा. १, दहीगांव १, किन्होळा १, मंगरूळ नवघरे १, उंद्री १, नागणगांव १, खंडाळा १, गांगलगाव ४, मोताळा ४, डिडोळा १, तारापूर ३, निपाणा ३, आव्हा १, शेलगाव बाजार २, लोणार ३, हिरडव १, सुलतानपूर ८, पळसखेड १, वानखेड ५, मनार्डी २, शेवगा २, हिंगणा ११, बाभुळखेड १, खामगाव १०८, लाखनवाडा २, सुटाळा ४, टेंभुर्णा १, गोंधनापूर १, आवार १, पिंप्री गवळी २, पिं. राजा १, शिरसगाव दे. १, हिवरखेड १, शेलोडी १४, शिर्ला नेमाने १, पोरज १, हिवरा बु २, नांदुरा २३, शेंबा २, जवळा बाजार १, वळती १, पिंप्री अढाव १, पातोंडा १, निमगाव १, टाकरखेड २, खैरा १, निमखेड १, बरफगांव १, मलकापूर २३, दाताळा २, लोणवडी १, दे. राजा ४०, सिनगांव जहा. ५, डोढ्रा २, चिंचोली बुरुकुल १, सावंगी टेकाळे १, गिरोली १, पांग्री १, जळगांव जामोद ८, बोराळा बु ५, बोराळा खु. ४, कजेगांव ४, पळशी सुपो ७, सुनगाव १, मेहकर २५, नायगाव दत्तापूर ४, सावंगी माळी २, सारंगपूर ७, कनका १, पांग्री काटे १, मादनी १, महागाव १, अंजनी बु १, कळमेश्वर २, जानेफळ २, चिंचोली बोरे १, खळेगांव २, डोणगाव १, सिं. राजा १०, सावखेड तेजन १, आडगांव राजा ४, ताडेगांव १, साखरखेर्डा ८, उमरद २, दत्तापूर १, शेगांव ७, लासुरा १, जलंब १, पहुरजिरा १, वाशिम जिल्ह्यातील असोला १, जळगाव जिल्ह्यातील एकाचा यामध्ये समावेश.
दरम्यान, चिखली येतील सिद्धार्थनगरमधील ६५ वर्षीय महिला आणि गोपालनगर खामगावमधील ७६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ५१४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
--३६२९ सक्रिय रुग्ण--
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २६ हजार २३० झाली आहे. त्यापैकी २२ हजार ३७९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयामध्ये ३,६२९ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. अद्यापही ३,५०५ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.