पाणीटंचाई निवारण्यासाठी दोन कोटीची पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:31 AM2021-01-21T04:31:17+5:302021-01-21T04:31:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मेहकर: तालुक्यातील घुटी पारडी येथील पाणीटंचाई कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दोन कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित ...

Two crore water supply scheme to alleviate water scarcity | पाणीटंचाई निवारण्यासाठी दोन कोटीची पाणीपुरवठा योजना

पाणीटंचाई निवारण्यासाठी दोन कोटीची पाणीपुरवठा योजना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर: तालुक्यातील घुटी पारडी येथील पाणीटंचाई कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दोन कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. या पाणीपुरवठा योजनेस पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्यता दिली आहे.

मेहकर तालुक्यातील घुटी पारडी येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत होते. उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होत असल्याने सामान्यांना त्रास सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेता आ. संजय रायमुलकर यांनी खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद प्रशासनाला पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा परिषद बुलडाणा यांनी नवीन योजनेचा प्रस्ताव तयार केला. या योजनेला पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मान्यता दिली. आता ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे रूपेश गणात्रा यांनी स्पष्ट केले.

Web Title: Two crore water supply scheme to alleviate water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.