शेतक-यांच्या मदतीचे दोन कोटी रुपये पडून

By admin | Published: August 26, 2015 11:50 PM2015-08-26T23:50:54+5:302015-08-26T23:50:54+5:30

२५00 शेतक-यांच्या मदतीची रक्कम सुमारे २ कोटी खातेक्रमांकाच्या घोळामुळे पडून आहे.

Two crores of rupees fall to the farmers' help | शेतक-यांच्या मदतीचे दोन कोटी रुपये पडून

शेतक-यांच्या मदतीचे दोन कोटी रुपये पडून

Next

खामगाव : दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना वितरणासाठी आलेल्या रक्कमेपैकी सुमारे २५00 शेतकर्‍यांच्या मदतीची रक्कम सुमारे २ कोटी खातेक्रमांकाच्या घोळामुळे पडून आहे. खरीप २0१४ मध्ये दुष्काळग्रस्तांना फक्त कोरडवाहू शेतकर्‍यांना हेक्टरी ४५00 रुपये याप्रमाणे २ हेक्टर पर्यंत मदत शासनाने जाहीर केली होती. ३८ हजार शेतकरी खामगाव तालुक्यात या लाभासाठी पात्र ठरले होते. शासनाने यासाठी निधीही पाठविला. मात्र सुमारे २५00 शेतकर्‍यांच्या बँक खात्याच्या घोळामुळे या शेतकर्‍यांना वाटपासाठी आलेली मद तीची रक्कम सुमारे १ कोटी ९0 लाख रुपये अद्यापही शेतकर्‍यांना मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. या व्यतिरीक्त काही शेतकर्‍यांचाही खात्यात पैसे जमा झाले नाही. तुमचे पैसे बँकेत पाठवले ,मिळतील असे उत्तर कर्मचार्‍यांकडून देण्यात येत असून शेतकर्‍यांना आल्या पावली परत पाठविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची स्थिती भीक नको पण कुत्र आवर अशी झाली आहे. अनेक शेतकर्‍यांचे रोजंदारी सोडून खामगावात येण्या-जाण्यावर मोठा खर्च झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्वरित मदत वाटपाची मागणी होत आहे.

Web Title: Two crores of rupees fall to the farmers' help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.