खामागवात दोन दिवसीय ‘सुखी जीवनाची गुरूकिल्ली’ कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:43 PM2019-11-16T12:43:14+5:302019-11-16T12:44:06+5:30
'सुखी जिवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर १६ व १७ नोव्हेंबर रोजी स्थानीक मुक्तेश्वर आश्रम येथे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सदगुरू वामनराव पै यांच्या संदेशावर आधारीत ‘सुखी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयार शनिवार १६ आणि रविवार १७ नोव्हेंबर रोजी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जीवनविद्या मिशनचे संतोष कात्रे प्रबोधन करणार आहेत.
खामगाव - जीवन विद्या मिशन शाखा मलकापूर यांच्या वतीने ‘सुखी जिवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर १६ व १७ नोव्हेंबर रोजी स्थानीक मुक्तेश्वर आश्रम येथे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘तुच आहेस तुज्या जिवनाचा शिल्पकार’ असा मौलीक संदेश देणारे सदगुरू वामनराव पै यांचे शिष्य असलेले संगणक अभियंता संतोष तोत्रे प्रबोधन करणार आहेत. दि.१६ व १७ नाव्हेंबर असे दोन दिवस सायंकाळी ७ ते ८ उपासना यज्ञ व दिपप्रज्वलन तसेच रात्री ८ ते ९.३० वाजेपर्यंत प्रबोधन होणार आहे. या कार्यक्रमामध्ये गुरुशिष्य यांचे नाते म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांचा अनुग्रह दिल्या जाणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अशोक अनासने , डॉ.प्रविण गासे, राहुल कोलते , एम.ए.सुरळकर, अजय आटोळे , सचिन मुंढे , अॅड.जयंत पाटील , अनिल बंड , गणेश माकोडे , चंदु भाटीया यांनी केले आहे.