जिल्ह्यात लॉकडाऊनची दोन दिवस कडक अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:47 AM2021-02-27T04:47:02+5:302021-02-27T04:47:02+5:30
त्यानुषंगाने प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील नागरी भागात शुक्रवारी दुपारी ३ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत या लॉकडाऊनची ...
त्यानुषंगाने प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील नागरी भागात शुक्रवारी दुपारी ३ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपासून या आदेशाची अंमबजावणी करण्यात येत आहे. परिणामी फेब्रुवारी महिन्याचे शेवटचे दोन्ही दिवस आता नागरिकांना एक प्रकारे घरातच बसावे लागणार असून सोमवारी सकाळी ८ वाजेनंतरच घराबाहेर पडता येणार आहे.
दरम्यान, या लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना बंद राहणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
--या सेवा राहतील सुरू--
दूधविक्रेते, दूध वितरण केंद्र सकाळी ६ ते दुपारी ३ आणि सायं. ६ ते ८:३० पर्यंत सुरू राहतील. अैाषधी सेवा, दवाखाने, रुग्णवाहिका, क्षमतेच्या ५० टक्के एसटी प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, पेट्रोलपंप २४ तास सुरू राहतील. टायर पंक्चरची दुकाने नियमित सुरू राहतील. पूर्वनियाेजित परीक्षा या वेळापत्रकानुसार सुरू राहतील तर बँक त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी स्पष्ट केले आहे.