कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, २६ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:22 AM2021-06-30T04:22:50+5:302021-06-30T04:22:50+5:30
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार ७५१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ७२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह ...
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार ७५१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ७२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील चार, खामगाव सहा, शेगाव दोन, देऊळगाव राजा तीन, चिखली एक, लोणार दोन, मोताळा एक, जळगाव जामोद तीन, सिंदखेड राजा एक आणि संग्रामपूर तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे. दरम्यान, मेहकर, मलकापूर आणि नांदुरा तालुक्यातील तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोनाबाधित आढळून आला नाही. उपचारादरम्यान शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात शेगाव येथील माळीपुरा भागातील ७५ वर्षीय महिला व बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयामध्ये मातला येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
दुसरीकडे ३८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ५ लाख ७० हजार २२१ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांपैकी ८५ हजार ८७९ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८६ हजार ६३८ झाली आहे. त्यापैकी ९६ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. अद्यापही १ हजार ५१३ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.