कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, ५३ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:24 AM2021-06-18T04:24:46+5:302021-06-18T04:24:46+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील दहा, खामगाव नऊ, शेगाव पाच, देऊळगाव राजा दोन, चिखली आठ, मेहकर दोन, मलकापूर आठ, मोताळा ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील दहा, खामगाव नऊ, शेगाव पाच, देऊळगाव राजा दोन, चिखली आठ, मेहकर दोन, मलकापूर आठ, मोताळा एक, जळगाव जामोद सहा, सिंदखेड राजा दोन याप्रमाणे ५३ जण कोरोना बाधित आढळून आले. दरम्यान, नांदुरा, लोणार आणि संग्रामपूर तालुक्यात तपासणीमध्ये एकही संदिग्ध कोरोना बाधित आढळून आला नाही.
उपचारादरम्यान बुलडाणा शहरातील काँग्रेसनगरमधील ५६ वर्षीय महिला, चिखली तालुक्यातील गांगलगाव येथील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे गुरुवारी ६१ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांपैकी ८५ हजार ३७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोबतच आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ५ लाख ४० हजार ३३२ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
--१०९ सक्रिय रुग्ण--
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८६ हजार १३३ झाली आहे. त्यापैकी १०९ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ६५३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.