बुलडाणा जिल्ह्यातील उडीदावर एकाच वेळी दोन रोगांचा हल्ला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 06:34 PM2018-08-27T18:34:29+5:302018-08-27T18:39:11+5:30
बुलडाणा: मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे व सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे उडीद पिकावर एकाच वेळी दोन रोगांचा हल्ला झाल्याचे दिसून येत आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे व सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे उडीद पिकावर एकाच वेळी दोन रोगांचा हल्ला झाल्याचे दिसून येत आहे. उडीदावर ‘पॉड बोरर’ने आक्रमण केले असून करपा रोगांचा घाला वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २० हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावरील उडीद पीक संकटात सापडले आहे.
जिल्ह्यात सरासरी २३ हजार ९६९ हेक्टर क्षेत्र उडीद पिकाचे आहे. त्यापैकी यावर्षी ८६ टक्के म्हणजे २० हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावर उडीद पेरणी झालेली आहे. उडीद हे ७० ते ७५ दिवसात येणारे पीक असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ होऊ शकतो. सध्या उडीद पीक शेंगा पक्वतेच्या अवसस्थेत आहे. दरम्यान, पेरणीनंतर मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने हे पीक धोक्यात सापडले होते. मात्र गेल्या आठवड्यात संततधार पाऊस झाला त्यामुळे मूग, उडीदासह सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांना संजीवनी मिळाली. परंतू पाणी साचुन राहणाºया क्षारपड किंवा हलक्या जमीनीतील पिकांना या संततधार पावसाने फटका बसल्याचे दिसून येत आहे. शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना उडीद पिकाला जास्त पाणी झाल्याने या पिकांवर आता विविध किडीचा प्रादुर्भाव होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मागील आठवड्यातील पावसाने उडीद पिकावर तपकीरी व काळे डाग पडले आहेत. त्यात सध्या निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे किडीचाही प्रादुर्भाव जाणवत आहे. पॉड बोररचे आक्रमण उडीदावर झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी वेगवेगळ्या औषधांची फवारणी करत आहेत. परंतू सध्या जिल्हाभर किडीसाठी पोषक असे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने महागड्या औषधांचाही किडीवर प्रभाव पडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
हमीभावासाठी येतात अडचणी
गतवर्षी उडीद काढणीच्या वेळेस पाऊस आल्याने उडीदावर डाग पडले होते. त्यामुळे शेतकºयांचा उडीद घेण्यास व्यापारी पाठ फिरवत होते. तर हमीभाव मिळणे दुरच. परंतू यावर्षी सध्या उडीद पिकाला तपकीरी डागाचा फटका बसत आहे. या डागांमुळे उडीद पीक धोक्यात सापडले आहे. ‘नॉनएफएक्यू’ दर्जाच्या नावाखाली डाग लागलेल्या उडीदाला हमीभाव मिळण्यासही अडचणी जाण्याची भिती आहे.
अशी आहे उडीदाची स्थिती
सध्या उडीद पीक धोक्यात सापडले असून खोडावर व पनावर तपकिरी ठिपके दिसून येत आहेत. अनेकठिकाणचे पाने पूर्णपणे करपले आहेत. रोगग्रस्त झाड पूर्णपणे वाळण्याची भिती शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. सध्या पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असल्याने शेंगाला सुद्धा किडीने पोखरल्याचे दिसून येत आहे.
रोगाचे लक्षणं दिसताच पाना ८० टक्के सल्फर टाकावे. दोन ग्रॅम एक लिटर पाण्यात मिसळून सायंकाळी फवारणी करावी. परंतू प्रादुर्भाव जास्त असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार उपायोजना कराव्या.
- नरेंद्र नाईक,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.