पलढग धरणाच्या जलाशयात आता दोन इंजिन बोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:36 AM2021-02-05T08:36:59+5:302021-02-05T08:36:59+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर २६ जानेवारी रोजी ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढग धरणाच्या जलाशयामध्ये दोन इंजिन बोटींचे केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा ...

Two engine boats now in the reservoir of Paldhag Dam | पलढग धरणाच्या जलाशयात आता दोन इंजिन बोटी

पलढग धरणाच्या जलाशयात आता दोन इंजिन बोटी

Next

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर २६ जानेवारी रोजी ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढग धरणाच्या जलाशयामध्ये दोन इंजिन बोटींचे केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पर्यटन विकास योजनेंतर्गत ज्ञानगंगा अभयारण्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर १० कोटी रुपयांच्या निधीतून येथे विविध कामे करण्यात येत आहेत. वनपर्यटकांसाठी महिला बचत गट अंतर्गत उपाहारगृहाचेसुद्धा उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रातील बांधवांशी संवादही साधला. कार्यक्रमासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी, ज्ञानगंगा अभयारण्य प्रकल्पाचे डी. सी. एफ. खैरनार, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, तारापूरचे सरपंच प्रवीण जाधव, योगेश जाधव, डॉ. गोपाल डिके, राहुल सोळंके, प्रवीण निमकरडे, बाळू जाधव आदींसह वनपरिक्षेत्र अभयारण्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Two engine boats now in the reservoir of Paldhag Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.