दोन दिवसात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:27 AM2017-10-07T01:27:22+5:302017-10-07T01:28:22+5:30

बुलडाणा/पिंपळगाव राजा: जिल्हय़ात दोन दिवसात दोन शे तकर्‍यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. 

Two farmers suicides in two days | दोन दिवसात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

दोन दिवसात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपळगाव राजा व म्हसला बु. येथील अल्पभूधारक शेतकरीएकाने विषारी द्रव्य घेऊन, तर दुसर्‍याने गळफास घेऊन सं पविली जीवनयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/पिंपळगाव राजा: जिल्हय़ात दोन दिवसात दोन शे तकर्‍यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. 
पिंपळगाव राजा येथील ५२ वर्षीय शेतकर्‍याने विषारी द्रव्य घेऊन  आत्महत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली. तसेच  बुलडाणा तालुक्यातील  म्हसला बु. येथील अल्पभूधारक शे तकरी सुभाष भोंडे यांनी कर्जापायी आत्महत्या केल्याची घटना ५  ऑक्टोबर रोजी घडली. 
शेतातील गोठय़ामध्ये त्यांनी गळफास घेतला. त्यांच्याकडे 0.५८  आर शेती असून, त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रचे चांडोळ  शाखेचे कर्ज आहे. गत तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा  सामना करावा लागत असून, यावर्षीही उत्पादनात घट आल्याने  त्यांनी मृत्यूचा मार्ग कवटाळला.
पिंपळगाव राजा येथील स्थानिक शंकर नगर भागातील रहिवासी  शेतकरी रवींद्र नारायण राजगुरे (वय ५२ वर्षे) यांचा मृतदेह ५  ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता येथून जवळच असलेल्या  बरफगाव फाट्यानजीक शेतामध्ये आढळून आला.  बरफगावकडे जाणार्‍या नागरिकांना सदर प्रकार दिसल्याने त्यांनी  पो.स्टे.ला कळविले.
 त्यानुसार ठाणेदार सुरेंद्र अहेरकर व पोलीस कर्मचारी घटनास् थळी जाऊन पंचनामा करून सदर मृतकाचे प्रेत खामगाव येथील  सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. रवींद्र  राजगुरे यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुले, मुलगी असा आप्त परिवार  आहे. 

Web Title: Two farmers suicides in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.