दोन गटात हाणामारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:57 AM2017-09-22T00:57:19+5:302017-09-22T00:57:27+5:30
सिंदखेडराजा : साखरखेर्डा येथील इंडियन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरुन वाहनचालक व पेट्रोल पंपावरील कामगार यांच्यात भांडण झाले. त्याचा परिणाम म्हणून वाहन चालकाचा पाठलाग करुन त्याला मारहाण करण्यात आली. तेथे काही वेळातच दुसरा गट पोहचून हाणामारी केल्या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी दोन्ही गटावर जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी २२ युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

साखरखेर्डा येथील काळीपिवळी चालक बहादूरसिंग राजपूत हा इंडियन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गेला असता तेथील कामगार बळीराम श्रीराम चांगाडे यांच्यासोबत भांडण झाले. बळीरामने गावातील काही युवकांना मोबाईलवर याची माहिती दिली. दरम्यान १0 ते १५ युवक मोटार सायकलवर पेट्रोल पंपावर आले आणि बहादूरसिंग राजपूत यांचा शोध घेत मलकापूर पांग्रा रोडने निघाले. बहाद्दूरला मारण्यासाठी काही युवक गेल्याची वार्ता साखरखेडर्य़ात पोहचताच दुसरा गटही रवाना झाला. मलकापूर पांग्रा येथे जावून दोन्ही गटात तुंबळ मारमारी झाली. साखरखेर्डा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच मलकापूर पांग्रा येथे पोहचले आणि हस्तक्षेप करुन दोन्ही गटाला पिटाळून लावले. मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असता दोन्ही गटाने तक्रार देण्यास नकार दिला. सदर भांडणाची व्हीडीओ क्लिप व्हायरल झाल्याने साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे पोहेकॉ सुरतसिंग इंगळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी बळीराम श्रीराम चांगाडे, राम जयराम अवचार, रवि रामेश्वर जगताप, भागवत अशोक खरात, मोहन जयराम अवचार, गोपाल नारायण इंगळे, अमोल गणपत अवचार, विक्रमसिंह भिकनसिंह राजपूत, जालमसिंह तुळशिरामसिंह राजपूत, लखनसिंह बिरबलसिंह राजपूत, सचिनसिंह इश्वरसिंह राजपूत, चरणसिंह गंगारामसिंह राजपूत, शुभमसिंह जगदीशसिंह राजपूत, बहाद्दूरसिंह प्रल्हादसिंह राजपूत यासह २२ आरोपी विरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी ३७(१) (३) १३५ मुपोका खाली गुन्हे दाखल केले आहेत. दुर्गा उत्सव काळात गावात शांतता निर्माण व्हावी, म्हणून साखरखेर्डा येथील १0२ नागरिकांना १४४ च्या नोटीसा जारी केल्या आहेत.