होलारपुऱ्यात दोन गटांत हाणामारी; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By admin | Published: July 5, 2017 12:15 AM2017-07-05T00:15:48+5:302017-07-05T00:15:48+5:30

शेगाव : शेगाव शहरातील होलारपुरा परिसरात सोमवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली असून, पोलिसांनी परस्पर तक्रारींवरून दोन्ही गटाच्या १६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Two groups clash in Holarpur; Cases filed against 16 people | होलारपुऱ्यात दोन गटांत हाणामारी; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

होलारपुऱ्यात दोन गटांत हाणामारी; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शेगाव शहरातील होलारपुरा परिसरात सोमवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली असून, पोलिसांनी परस्पर तक्रारींवरून दोन्ही गटाच्या १६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सचिन श्याम मोरे (वय २७) रा. होलारपुरा, सरकारी फैल, शेगाव याने दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी हा आरोपी गणेश ढाळेसोबत बोलत असताना फिर्यादीचा भाऊ जितू मोरे हा तेथे आला व म्हणाला, की तू समाजाचा नेता नाही, असे म्हटले असता आरोपीच्या सोबत असलेल्या इतर आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून जितू मोरे याला मारहाण करून खाली पाडले व डोक्यात लोखंडी पाइप मारून जखमी केले, तसेच फिर्यादीचा लहान भाऊ गणेश मोरे यालासुद्धा पाठीवर लोखंडी पाइप मारला व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या रिपोर्टवरून व मेडिकल सर्टिफिकेटवरून पोलिसांनी आरोपी गणेश ढाळे, विशाल करडे, विलास केंगारकर, अजय करडे, करण करडे, विजय नामदास, राकेश नामदास रा. होलारवाडा सरकारी फैल शेगाव यांच्याविरुद्ध अप.क्रं. २९४/१७ कलम १४३, १४८, १४७, १४९, ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास पो.हे.काँ. बळीराम वरखेडे व पो.काँ. प्रकाश शेळके हे करीत आहेत. राकेश राजू नामदास (वय २२) वर्षे रा. होलारपुरा, सरकारी फैल शेगाव याने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी संदीप मोरे हा म्हणाला, की तू आमचे नाव पोलिसांत का सांगितले, असे म्हणून त्याची गच्ची पकडून व आरोपी युवराज मोरे, सोनू मोरे, आकाश मोरे याने त्याच्या हातातील काचेची बॉटल फिर्यादीच्या कानावर मारली व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतर आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपी आरोपी युवराज मोरे, सोनू मोरे, आकाश मोरे, जितू मोरे, सचिन मोरे, राकेश आयवडे, गणेश मोरे, अजय सोनुने, संदीप मोरे रा. होलारवाडा सरकारी फैल शेगाव यांच्याविरुद्ध अप.क्रं.२९५/१७ कलम १४३, १४७, ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास पो.हे.काँ. बळीराम वरखेडे व पो.काँ. प्रकाश शेळके हे करीत आहेत.

Web Title: Two groups clash in Holarpur; Cases filed against 16 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.