बुलडाणा जिल्ह्यात दोन सधन कुक्कुट गटांची स्थापना करण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:29 PM2017-10-13T13:29:59+5:302017-10-13T13:30:09+5:30
बुलडाणा – राज्यात बुलडाणा जिल्ह्यासह 10 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक अथवा खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट गटांची स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
बुलडाणा – राज्यात बुलडाणा जिल्ह्यासह 10 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक अथवा खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट गटांची स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात दोन सधन कुक्कुट विकास गटांची स्थापना करावयाची आहे. त्याकरीता जिल्ह्यातून इच्छूक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छूक अर्जदार कुक्कुट पालन व्यवसाय करीत आहेत. तसेच ज्यांचेकडे सद्यस्थितीत हॅचर व सेटर (अंडी उबवण सयंत्र) सयंत्राची हाताळणी केली जात आहे, अशा लाभार्थ्यांना लाभार्थी निवड करताना प्राधान्य देण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार लाभार्थी निवड जिल्हास्तरीय समितीर्मात केली जाणार आहे. या योजनेचा कालबद्ध अंमलब - जावणी आराखडा तयार केला असून लाभार्थ्यांना 23 ऑक्टोंबर 2017 पर्यंत अर्ज पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभाग कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छूकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. व्ही. बी जायभाये यांनी केले आहे.