ट्रक-टॅंकरच्या अपघातात दोघे ठार, एक गंभीर; मलकापूर- बुलढाणा घुस्सर फाट्यानजीकची घटना

By विवेक चांदुरकर | Published: August 14, 2023 10:35 PM2023-08-14T22:35:31+5:302023-08-14T23:26:01+5:30

ट्रकने पेट घेतल्यामुळे आगीचे डोंब उठले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली.

Two killed, one critically in truck-tanker accident; Incident near Malkapur-Buldhana Ghussar road | ट्रक-टॅंकरच्या अपघातात दोघे ठार, एक गंभीर; मलकापूर- बुलढाणा घुस्सर फाट्यानजीकची घटना

ट्रक-टॅंकरच्या अपघातात दोघे ठार, एक गंभीर; मलकापूर- बुलढाणा घुस्सर फाट्यानजीकची घटना

googlenewsNext

मलकापूर (बुलढाणा) : भरघाव ट्रक व दुधाच्या टँकरमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मलकापूर- बुलढाणा रस्त्यावर घुस्सर फाट्यानजीक सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.  

या घटनेत टँकर उलटला तर तर ट्रकने पेट घेतला. नारळाने भरलेला ट्रक क्र.आर.जे.१७ - जी.ए.५२९२ बुलढाण्यावरुन मलकापूरकडे येत होता. घुस्सर फाट्यानजीक पेपर मिलजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या दुधाच्या टँकरला ट्रकने धडक दिली. या अपघातानंतर दुधाचा टँकर उलटला तर ट्रकला आग लागली.

ट्रकने पेट घेतल्यामुळे आगीचे डोंब उठले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे आजूबाजूला असलेल्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्यासाठी सरसावलेल्या नागरिकांनी पेटलेल्या ट्रकमधील चालक जागीच ठार असल्याने वाहकाला कसेबसे बाहेर काढले. मात्र, त्याची तब्येत अत्यवस्थ असल्याने त्याला बुलढाणा हलविण्यात आले आहे. दुधाच्या टँकरचा चालक जागीच ठार झाला आहे.

टॅंकरमध्ये चालक एकटाच असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थितांनी दिली. या अपघातात नारळाच्या ट्रकने पेट घेत भीषण रुप धारण केले होते. विलास खर्चे यांनी संपर्क करताच माजी नगराध्यक्ष अँड हरीश रावळ यांनी तत्काळ अग्निशमन दल पाठविल्याने तब्बल दिड तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मृतांची नावे वृत्त लिहेपर्यंत कळू शकली नाही. घटनास`थळावर नागरिकांची गर्दी झाली होती.

Web Title: Two killed, one critically in truck-tanker accident; Incident near Malkapur-Buldhana Ghussar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.