दुचाकी-जेसीबीच्या अपघातात दाेन ठार, एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:07 PM2021-07-21T12:07:09+5:302021-07-21T12:07:17+5:30
Two killed, one injured in two-wheeler-JCB accident : मृत पावलेल्यांमध्ये शेख दानिश ऊर्फ मोनू (१८), फिरोज खान सलीम खान (१७) यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : येथील मेहकर फाट्यावरून चिखलीकडे येत असलेल्या दुचाकी व जेसीबीची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दाेन जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये शेख दानिश ऊर्फ मोनू (१८), फिरोज खान सलीम खान (१७) यांचा समावेश आहे.
शेख दानिश शेख बिबन ऊर्फ मोनू, फिरोज खान सलीम खान (१७), रोहित प्रदीप कंकाळ (१९) हे तिघे जण दुचाकीद्वारे (एमएच-२०-सीएफ-०९९३) मेहकर फाटा परिसरात फोटोशूट करून चिखलीकडे परत येत होते. दरम्यान, चिखली-देऊळगावराजा महामार्गावरील स्थानिक एका पेट्रोल पंपासमोर रस्ता अेालांडणाऱ्या जेसीबी मशीनला (एमएच-२८-एझेड-५३७५) त्यांच्या दुचाकीची जबर धडक बसली. यामध्ये दुचाकीचालक शेख दानीश ऊर्फ मोनू (रा. हिदायतनगर, माळीपुरा, चिखली) याचा जागीच तर फिरोज खान सलीम खान (१७) याचा औरंगाबाद येथे नेत असताना मृत्यू झाला. दरम्यान रोहित प्रदीप कंकाळ (१९, रा. सातगाव भुसारी) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.