समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात दोन कृषी समृद्धी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 05:03 PM2018-10-09T17:03:01+5:302018-10-09T17:03:06+5:30

बुलडाणा: जिल्ह्यातून गेलेल्या सुमारे ८७ किमीच्या समृद्धी महामर्गावर मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात दोन कृषी समृद्धी केंद्र अर्थात नवगनर निर्माणाच्या हालचालींनी वेग घेतला

Two Krishi Prosperity Centers in Buldhana district on the Samrudhi highway | समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात दोन कृषी समृद्धी केंद्र

समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात दोन कृषी समृद्धी केंद्र

googlenewsNext

-  नीलेश जोशी

बुलडाणा: जिल्ह्यातून गेलेल्या सुमारे ८७ किमीच्या समृद्धी महामर्गावर मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात दोन कृषी समृद्धी केंद्र अर्थात नवगनर निर्माणाच्या हालचालींनी वेग घेतला असून, मेहकर तालुक्यातली काब्रा येथे नुकतीच खा. प्रतापराव जाधव आणि एमएसआडीसीचे कार्यकारी अभियंता उद्य भरडे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी बैठक घेण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने साब्रा, काब्रा, फैजलपूर परिसरात आणि सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव परिसरात एक या प्रमाणे हे कृषी समृद्धी केंद्र अर्थातन नवगर उभारण्यात येणार आहे. दोन्ही केंद्रांसाठी प्रत्येकी ५०० हेक्टर प्रमाणे जमीन उपलब्ध करून द्यावी लागेल. त्यादृष्टीने संबंधीत गावात आसा संवादकांच्या मार्फत शेतकर्यांकडून संमतीपत्र घेण्यात येत आहे. दोन आक्टोबर रोजी अनुषंगीक विषयान्वये साब्रा येथे ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस रस्ते विकास महामंडळाचे विटकर, विभागीय समन्वयक सचिन तोडकर, रस्ते विकास महामंडळाचे बुलडाण्याचे कार्यकारी अभियंता उदय भरडे, जिल्हा समन्वयक मधुसूदन खडसे, समृद्धी महामार्गचे अधिकारी दिनेश गिते, तहसिलदार राजेंद्रसिंह जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे बैठकीस उपस्थित अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान, महामार्गासाठी जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ७ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आलेली आहे. ५०० हेक्टरवर राहणार समृद्धी केंद्र नवनगर अर्थात कृषी समृद्धी केंद्र हे जवळपास ५०० हेक्टरवर उभारण्यात येणार आहे. यामध्ये प्राुख्याने कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, शाळा, महाविद्याल, कोल्ड स्टोअरेज तथा अन्य सुविधा उपलब्ध राहणार आहेत. त्यातच जालना जिल्ह्यात ड्रायपोर्ट (जमीनीवरील बंदर) उभारण्यात येत असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील दोनही समृद्धी केंद्रांचा चांगलाच भाव वधारण्याची शक्यता आहे. अमरावती, अकोला येथून कृषीचा माल, नाशवंत वस्तू तथा बुलडाणा जिल्ह्यातील माल ड्रायपोर्ट मार्गे देशात अन्यत्र किंवा परदेशास पाठविण्यास मोठा वाव मिळण्याची शक्यता आहे. सावरगाव माळ येथील कृषी समृद्धी केंद्र तर ड्रायपोर्ट पासून जवळच असल्याने त्याचा जिल्ह्यास व शेतकर्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जमीन देणारे शेतकरी राहणार भागिदार

या कृषी समृद्धी केंद्रासाठी जमीन देणारे शेतकरी यामध्ये भागिदार राहणार असून त्यांची जमीन ही भूसंचन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यामध्ये जमीन देणार्या शेतकर्यास व्यावसायिक आणि रेशिडेनशीयस्तरावर जागा दिल्या जाणार आहे. तसेच कुटुंबातील एका युवकास व्यावसायिक, औद्योकि, तथा कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येईल. या व्यतिरिक्त शेतीच्या बदल्यात प्लॉटिंग देण्यासोबतच जिरायती क्षेत्रासाठी ३० हजार एकरी, हंगामी बागायतीसाठी ४५ हजार रुपये आणि बागायती क्षेत्रासाठी ६० हजार रुपया प्रमाणे प्रतीवर्ष नुकसान भरपाईही देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात साब्रा आणि सावरगाव माळ येथे कृषी समृद्धी केंद्र अर्थात नवनगर उभारण्यात येणार असून त्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. साब्रा येथे नुकतीच बैठक झाली असून त्यास प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात दोन्ही ठिकाणी यासाठी प्रत्येकी ५०० हेक्टर जागेची गरज भासले. संवादकामार्फत शेतकर्यांशी संपर्क साधण्यात येत असून जमीनीसाठीचे संमतीपत्रक घेण्यात येत आहे.

-मधुसूदन खडसे, जिल्हा समन्वयक, समृद्धी महामार्ग, बुलडाणा

Web Title: Two Krishi Prosperity Centers in Buldhana district on the Samrudhi highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.