कारसह दोन लाखांचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:17 AM2017-07-20T00:17:12+5:302017-07-20T00:17:12+5:30
मलकापूर : २ लाख ३७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जवळ बाळगून वाहतूक करताना मलकापूर पोलिसांनी एकास अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : विना परवाना देशी दारुचे ३५ बॉक्स रुपये ७७ हजार ३७६ व १ लाख ५० हजाराची मारुती ओमीनी असा २ लाख ३७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जवळ बाळगून वाहतूक करताना मलकापूर पोलिसांनी एकास अटक केल्याची घटना १८ च्या रात्री ९ वाजेच्या सुमारास येथील वानखेडे पेट्रोल पंपाजवळ घडली.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पोलीस उपविभागीय अधिकारी गिरीश बोबडे, पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, ब्रिजलाल मापारी, प्रकाश कोळी, श्यामनंद सिरसाठ, पवन सपकाळ आदींच्या पथकाने गुप्त माहितीवरुन वानखेडे पंपाजवळ नाकाबंदी केली. १८ च्या रात्री ९ वाजेच्या सुमारास जितेंद्रसिंह जसवंतसिंह राजपूत (वय ३८) रा.मलकापूर हा ओमीनी क्र.एम.एच.१२-ई.जि.५६२२ या गाडीने विनापरवाना ७७ हजार ३७६ रुपये किमतीची देशी दारुचे ३५ बॉक्स जवळ बाळगून वाहतूक करत असताना त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्रसिंह राजपूत यास अटक करुन त्याच्याविरुद्ध कलम ६५ (क) (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.