ग्रामपंचायतचे दोन सदस्य अपात्र
By admin | Published: June 25, 2017 09:22 AM2017-06-25T09:22:05+5:302017-06-25T09:22:05+5:30
डोणगाव ग्रामपंचायतचे सदस्य अ. साबीर अ. गफ्फार व सदस्य चांदबी शे. कासम बागवान अपात्र
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव: ग्रामपंचायतचे सदस्य अ. साबीर अ. गफ्फार व सदस्य चांदबी शे. कासम बागवान यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१) (ज-३) प्रमाणे शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व ज्ञानेश्वर श्रीनिवास आखाडे व हमजाशाह इब्राहीम शाह रा. डोणगाव व गुलाबखा शरमखा यांच्या तक्रारीवरून सदस्यत्व अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश २२ जून रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांनी काढला आहे.
सदर आदेशामध्ये अर्जदार गुलाबखा शरमखा यांनी गैरअर्जदार ग्रा.पं. सदस्य अ. साबीर अ. गफ्फार यांच्या विरोधात शासकीय व सार्वजनिक रस्त्यामध्ये बोअर घेऊन अतिक्रमण केल्याची तक्रार केली होती. तर ग्रा.पं. सदस्य चांदबी शे. कासम बागवान यांच्याविरुद्ध ज्ञानेश्वर श्रीनिवास आखाडे व हमजाशाह इब्राहीमशाह यांनी सदर ग्रा.पं. सदस्यांनी आपल्या घराजवळ रस्त्यालगत अतिक्रमण करून बोअर घेतला असल्याने सदस्यत्व अपात्र घोषित करण्याची मागणी केली होती. यावर मंडळ अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनी ९ जून रोजी दिलेल्या अहवालावरून उपरोक्त आदेश देण्यात आला आहे.