दुचाकीवर दारू घेऊन जाताना दोघांना पकडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:19 AM2017-07-18T00:19:05+5:302017-07-18T00:19:05+5:30
मलकापूर : दुचाकीवर अवैधरीत्या विदेशी कंपनीची दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दारू व दुचाकीसह ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : दुचाकीवर अवैधरीत्या विदेशी कंपनीची दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दारू व दुचाकीसह ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी दसरखेड फाटा येथे १७ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास केली.
तालुक्यातील रणथम येथे दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनच्यावतीने पोनि. माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन कायद्यांतर्गत मोहीम राबविणे सुरू असताना एमएच २८-१४७२ या दुचाकीला रोखण्याचा प्रयत्न झाला; मात्र दुचाकीस्वार कमलाकर ऊर्फ रामा प्रभाकर पाटील (वय ३०), रवींद्र श्यामराव पाटील (वय ३९) दोघे रा. कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताई नगर या दोघांनी दुचाकी थांबविली नाही. त्यामुळे पोकाँ आनंद माने, संजय निंबोळकर, दिलीप रोकडे, प्रमोद पोलाखरे, सुभाष पहुरकर यांनी या दुचाकीचा पाठलाग करीत दसरखेड फाटा येथे दुचाकी थांबविली. दरम्यान, झडती घेतली असता, या दोघांकडे मोठ्या थैलीत विदेशी कंपनीच्या ४८ बॉटल अंदाजे किं. ६९९० रुपये, व्हिस्की ९६ बॉटल ंिकं. १६३२० रुपये अशी विदेशी दारू आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी दारूसह ३० हजार रुपये किमतीची दुचाकी ताब्यात घेतली. या कारवाईत एकूण ५३ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.