खामगावात आणखी दोन कोविड केअर सेंटर कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 07:35 PM2021-05-25T19:35:17+5:302021-05-25T19:37:10+5:30

Khamgaon News : गृह विलगीकरणाचा पर्याय नाकारण्यात आल्यानंतर लागलीच खामगाव येथे दोन कोविड केअर तातडीने कार्यान्वित करण्यात आले आहे.

Two more Covid Care Centers are operational in Khamgaon | खामगावात आणखी दोन कोविड केअर सेंटर कार्यान्वित

खामगावात आणखी दोन कोविड केअर सेंटर कार्यान्वित

Next
ठळक मुद्देबुधवारपासून अंमलबजावणीग्रामीण भागातील रूग्णांवरही नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील कोरोना बाधित रूग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय नाकारण्यात आल्यानंतर लागलीच खामगाव येथे दोन कोविड केअर तातडीने कार्यान्वित करण्यात आले आहे. यापूर्वी कोविड रूग्णालय आणि एकच कोविड केअर खामगावात कार्यान्वित होते. मात्र, आता दोन कोविड केअर सेंटर वाढविण्यात येणार आहेत.
खामगाव शहरातील रूग्णांसाठी घाटपुरी रोडवरील कोविड केअर सेंटर नंतर जलंब रोडवरील पॉलिटेक्नीक कॉलेज होस्टेल आणि शाळा क्रमांक ६ जवळील पंचशील धर्मार्थ दवाखाना संस्थात्मक अलगीकरणासाठी कार्यान्वित केला जाणार आहे. संस्थात्मक अलगीकरणात राहणाºया रूग्णांना स्वत:चे अंथरून आणि पांघरून सीसीसी केंद्रावर न्यावे लागेल. तसेच रूग्णांच्या कुटुंबियांना येथे डबा पोहोचविण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सेंटरवर पाणी लाईट साफसफाईची व्यवस्था ग्रामपंचायतकडे तर शहरामध्ये नगर परिषद कडे असेल संबंधित गावाच्या आशा वर्कर बाधित रूग्णांची रजिस्टरमध्ये नियमित नोंदी घेऊन त्यांचे रेग्युलर चेकअप करतील काही त्रास असल्यास पेशन्ट खामगाव येथे हलविण्यात येईल. ग्रामीण भागातील रूग्णाला शाळेत पोचवण्यासाठी जबाबदारी ग्रामसमिती सदस्य तर शहरात कर्मचारी चमू नेमण्यात आली आहे. बाधित रूग्णाने संस्थात्मक अलगीकरणास विरोध केल्यास बिट जमादार /पोलीसांची मदत घेतली जाईल. तसेच चे मदत घेऊन रूग्णाला सेंटरवर पोचविण्यात येईल. संस्थात्मक अलगीकरण केंद्रावर इतर कर्मचाºयांचीही ड्युटी लावली जाणार आहे.
 
कोरोना विषाणू संक्रमनाची साखळी मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. संसर्गाचा फैलाव टाळण्यासाठी नियमावलीचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे. दानशुरांनी केंद्रावरील सुविधांसाठी मदत करावी.
- राजेंद्र जाधव
उपविभागीय अधिकारी, खामगाव.
 
 

Web Title: Two more Covid Care Centers are operational in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.