बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू , ३८ पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:18 AM2020-08-14T11:18:48+5:302020-08-14T11:19:19+5:30
जिल्ह्यात मृत्यूंची संख्या ३८ वर पोहचली आहे. तसेच ३८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आणखी दोघांचा १३ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. त्यामुळे, जिल्ह्यात मृत्यूंची संख्या ३८ वर पोहचली आहे. तसेच ३८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दोघांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या २०६७वर पोहचली आहे. तसेच ७९५ रुग्ण विविध रुग्णांलयांमध्ये उपचार घेत आहेत.
गुरूवारी २५० अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २१२ अहवाल निगेटिव्ह असून ३८ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. नांदुरा येथील ५० वर्षीय पुरूष व चैतन्यवाडी, बुलडाणा येथील एका ७७ वर्षीय पुरूष रूग्णांचा उपचारादरम्यान गुरूवारी मृत्यू झाला आहे. पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये नांदुरा येथील एक, भावसार देवी मंदीराजवळ एक , शिवाजी नगर दोन , दे. राजा येथील माळीपुरा एक, कोलारा ता. चिखली येथील दोन, सोनेवाडी ता. चिखली येथील एक, बुलडाणा शहरातील सोळंके ले आऊट एक, विष्णूवाडी एक, चैतन्यवाडी एक, पिंपळगांव सराई ता. बुलडाणा येथील एक, धाड ता. बुलडाणा येथील दोन, मलकापूर येथील तीन, सुलतानूपर ता. लोणार येथील एक , तपोवन ता. मोताळा येथील एक, भालेगांव ता. मलकापूर येथील तीन , झोडगा वसर ता. खामगांव येथील एक, खामगांव शहरातील जुना फैल येथील तीन, अनिकेत रोड येथील तीन, घाटपुरी नाका येथील एक, गोपाल नगर येथील एक, खती ले आऊट येथील एक ,शेगांव शहरातील धनोकार नगरातील एक, सुरभी कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. दोन रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
१२३४ रुग्णांची कोरोनावर मात
आजपर्यंत १३ हजार २२५ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२३४ बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १२६ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १३२२५ आहेत. जिल्ह्यात २०६७ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ७९५ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ३८ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.