बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन बळी; २७१पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:18 AM2021-02-20T11:18:29+5:302021-02-20T11:18:50+5:30
CoronaVirus चिखली येथील ५० वर्षीय व्यक्ती व बुलडाणा येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा बळी घेतला आहे, तर शुक्रवारी तपासणी केलेल्या अहवालांपैकी २७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १७४५ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले होते. त्यापैकी १६ टक्के नमुने हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा २७, कोलवड एक, सागवन एक, नांदुरा १९, काटी एक, पिंप्री आढाव दोन, सुटाळा बुद्रूक एक, टेंभुर्णा एक, माक्ताेक, बोथाकाजी एक, खामगाव १७, शेगाव १९, जानोरी सहा, गायगाव पाच, सांगवा एक, पिंपळवाडी एक, मेहकर आठ, जानेफळ एक, डोणगाव एक, चिखली २७, कोलारा एक, पेठ एक, खैरव दोन, मंगरूळ नवघेर तीन, दहीगाव एक, टाकरखेड वायाळ एक, करवंड दोन, भरोसा एक, केळवद एक, देऊळगाव राजा १८, आळंद दोन, मेहुणा राजा एक, गारगुंडी एक, भिवगन दोन, नागणगाव एक, देऊळगाव मही एक, सिनगाव जहागीर १७, डोढ्रा दोन, पिंपळगाव देशमुख एक, झाडेगाव पाच, वडशिंगी एक, कुरणखेड दोन, जळगाव जमोद एक, सि. राजा चार, रुम्हणा दोन, जांभोरा दोन, दुसरबीड एक, सावळा एक, चिंचोली एक, साखरखेर्डा चार, आडगाव राजा एक, उमरगाव एक, मलकापूर १६, एकलारा एक, पळशी दोन, लोणार १७, सुलतानपूर एक, मोताळा तीन आणि अकोला जिल्ह्यातील अंदुरा येथील एक, जालना जिल्ह्यातील रफाळा येथील एक, परतूर येथील एक आणि जाफ्राबाद येथील दोन बाधितांचा यात समावेश आहे. यासोबतच चिखली येथील ५० वर्षीय व्यक्ती व बुलडाणा येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी एकूण ६६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यात मलकापूर कोविड केअर सेंटरमधून २१, लोणार चार, चिखली ११, देऊळगाव राजा पाच, जळगाव जामोद एक, खामगाव सहा, बुलडाणा १७, नांदुरा कोविड सेंटरमधील एकाचा यात समावेश आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एक लाख १८ हजार ३८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १४,३९५ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी झाली.