लाच घेताना पाेलीस कर्मचाऱ्यासह दाेघं गजाआड
By संदीप वानखेडे | Published: October 30, 2023 05:15 PM2023-10-30T17:15:06+5:302023-10-30T17:15:35+5:30
बिबी पाेलिस स्टेशनअंतर्गत तक्रारदार व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे.
बुलढाणा - दाखल झालेल्या कलम ४९८च्या गुन्ह्यात तक्रारदार व कुटुंबीयांना अटक न करण्यासाठी ३ हजार ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पाेलिस कर्मचाऱ्यास सफाई कामगारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २९ ऑक्टाेबर राेजी रात्री रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी रात्री उशिरा दाेन्ही आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी एसीबीने ही कारवाई केली.
बिबी पाेलिस स्टेशनअंतर्गत तक्रारदार व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा न्यायालयाच्या निकालावर प्रलंबित आहेत. न्यायालयाने तक्रारदार व त्यांचे आई-वडील, तसेच इतर नातेवाइकांविरुद्ध जमानती वारंट काढला हाेता. बिबी पाेलिस स्टेशनचे पाेलिस काॅन्स्टेबल ज्ञानबा राजाराम साेसे याने तक्रारदार यांना तुम्हाला व तुमच्या आई-वडील आणि इतर नातवाेइकांना अटक न करण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजाेडीअंती साेसे याने बिबीचे सफाई कामगार विजय फकिरा उबाळे याच्यामार्फत ३ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई कारवाई अँटी करप्शनचे अमरावती परीक्षेत्राचे पाेलिस अधीक्षक माराेती जगताप, अप्पर पाेलिस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात शीतल घाेगरे, पाेलिस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युराे बुलढाणा व त्यांच्या पथकाने केली. दाेन्ही आराेपींविरुद्ध बिबी पाेलिस स्टेशनमध्ये २९ ऑक्टाेबर राेजी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.