दोन शाळा बंद

By admin | Published: July 12, 2014 10:15 PM2014-07-12T22:15:14+5:302014-07-12T22:15:14+5:30

कुलुप ठोकले : शाळा चार दिवसापासून बंद

Two schools closed | दोन शाळा बंद

दोन शाळा बंद

Next

बुलडाणा: कायमस्वरुपी व पुरेशा शिक्षका अभावी गेल्या चार दिवसापासून बोरखेड येथील शाळा बंद आहे, सावळी येथील एक शिक्षक प्रतिनियुक्तीवर दुसरीकडे हलविल्यामुळे येथील ग्रामस्थांनी शाळेला कुलुप ठोकले तर धाड येथील उदरु माध्यमिक शाळेला शारिरिक शिक्षक नसल्यामुळे येथील पालकांनी सुध्दा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या दोन्ही घटनांमुळे धाड परिसरात शिक्षणक्षेत्र सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडला असुन या सार्‍या प्रकाराला अधिकार्‍यांचा बेजाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. येथून जवळच असलेल्या सावळी येथे जिल्हा परिषदेची मराठी प्राथमिक शाळा आहे. येथे वर्ग १ ते ४ थी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. जवळपास १00 विद्यार्थी असलेल्या या शाळेवर केवळ तिन कायम शिक्षक आहेत. यातील एक शिक्षक मागील ६ वर्षापासून प्रतिनियुक्तीवर भादोला येथे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे चार वर्गासाठी केवळ दोनच शिक्षक आहेत. अपुर्‍या शिक्षकामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. यासंदर्भात ग्रामस्थानी वेळोवेळी निवेदने देवूनही शिक्षण विभागाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. अखेर संतप्त नागरीकांनी १२ जुलै रोजी शाळेला कुलुप ठोकले आहे. बोरखेड येथे १ ते ४ थी पर्यंत वर्ग आहे. मात्र येथे सुध्दा कायमस्वरुपी शिक्षकांची पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या शाळेत पालकांनी विद्यार्थी पाठविणे बंद केले आहे. गेल्या चार दिवसापासून ही शाळा सुध्दा बंद आहे. नागरीकांनी आंदोलन केले म्हणजे शिक्षण विभाग तात्पुरती व्यवस्था करून वेळ मारून नेण्याचे काम करीत आहे. धाड येथील जिल्हा परिषदेच्या उदरु माध्यमाच्या शाळेत ८ ते १0 वी पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. मात्र येथे मागील पाच वर्षापासून कायमस्वरुपी शारिरीक क्षिकाची जागा भरलेली नाही. येथे ८ वीच्या दोन तुकड्यांना मान्यता मिळाली.तर ९ वीची तुकडी मंजूर झाली आता येथे एकून ६ तुकड्या असताना शिक्षक केवळ चारच आहेत. येथे शिक्षकांची पदे भरण्यात यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा येथील नागरीकांनी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिला आहे. या प्रकारामुळे धाड परिसराती शिक्षणक्षेत्रा सुरू असलेल्या घटनांची शिक्षण विभागाने याची दखल घेण्याची गरज आहे.

Web Title: Two schools closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.