लोणार येथे दोन दुकनात चोरी, 27 हजारांचा माल लंपास
By admin | Published: May 9, 2017 01:51 PM2017-05-09T13:51:09+5:302017-05-09T13:51:09+5:30
८ मे च्या रात्री झालेल्या चोरीमध्ये एकूण अंदाजे २७ हजार रुपयांची चोरी
लोणार : शहरातील लोणी मार्गावर खटकेश्वर नगरमधील ओम साई ई महासेवा केंद्र आणि कुंभारे विमा सेवा केंद्र मध्ये ८ मे च्या रात्री झालेल्या चोरीमध्ये एकूण अंदाजे २७ हजार रुपयांची चोरी
झाल्याचे आढळून आले. ९ मे रोजी सकाळी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक
भाऊसाहेब सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला.
लोणार झ्र लोणी मार्गावर असलेल्या खटकेश्वर नगरमध्ये भारत दराडे यांचे ओम साई ई महासेवा केंद्र असून त्याठिकाणी भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र ही चालवितात. यामुळे त्यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर
पैशाचे व्यवहार होतात. ८ मे ला लग्न सराई दाट असल्यामुळे भारत दराडे रात्री कार्यालयात येऊ शकले नाहीत . त्यांचेवर पाळत ठेऊन असलेल्या चोराने ८ मे च्या रात्री कार्यालयाचे शटर वाकवून चोरी केली. सुदैवाने
पैसे वाटप झाल्याने कार्यालयात असलेले ४ हजार ५०० रुपये चोरीला गेले .
त्यानंतर शेजारीच असलेल्या कुंभारे विमा सेवा केंद्र च्या कार्यालयाचेहि
कुलूप तोडून २२ हजार ५०० रुपये चोरट्याने पळविले. ९ मेच्या सकाळी हा
प्रकार शेजार्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी भारत दराडे यांना दुरध्वनी
वरून कळविले. चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब
सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला . पुढील कारवाई पो.उ.नि.उकंडराव
राठोड करीत आहेत.