चिमुकल्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:08 AM2017-10-30T00:08:58+5:302017-10-30T00:10:40+5:30

धाड: जवळच असलेल्या बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड  येथे दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू  झाल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री १0.३0 ला उघडकीस  आल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली. 

two small brothers fall in the well, die | चिमुकल्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

चिमुकल्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्देपांगरखेड येथील घटनागावासह परिसरात पसरली शोककळा 

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड: जवळच असलेल्या बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड  येथे दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू  झाल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री १0.३0 ला उघडकीस  आल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली. 
बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड येथील नंदकिशोर जाधव  यांना दोन मुले नामे अभय (वय ११) व गौरव (वय ७) हे  गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते. अभय हा  चौथ्या  वर्गात तर गौरव दुसर्‍या वर्गात शिकत होता. दिवाळीच्या सुट्या  असल्याने दोन्ही मुले गावाजवळीलच आपल्या गट नं. ६४  मधील शेतात खेळण्यासाठी जात होती. दरम्यान, २८ ऑक्टोबर  रोजीसुद्धा दोन्ही मुले शेतात गेली; परंतु रात्री उशिरापर्यंत परत न  आल्याने घरच्यांनी दोन्ही मुलांची शोधाशोध सुरू केली.  दरम्यान, रात्री १0 च्या सुमारास नंदकिशोर जाधव यांच्या गट नं.  ६४ मधील शेतातील विहिरीत मोठा मुलगा अभयचा मृतदेह  तरंगताना नागरिकांना आढळला. तर गौरवचा पत्ता लागत  नसल्याचे पाहून तब्बल चार विद्युत पंपांनी विहिरीतील पाणी उ पसा करण्यात आल्यावर गाळात गौरवचा मृतदेह आढळला. या  घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी धाड  पोलिसांनी र्मग दाखल केला असून, उत्तरीय तपासणी बुलडाणा  जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आल्यानंतर शव ना तेवाइकांच्या हवाली करण्यात आले आहे. पुढील तपास धाड  पोलीस करीत आहे. २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर पांगरखेड  येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सैलानी ढासाळवाडी तलावात भाविक बुडाला
पिंपळगाव सैलानी: बुलडाणा तालुक्यातील सैलानी ढासाळवाडी  तलावामध्ये २९ ऑक्टोबर रोजी भाविक बुडाला असून, त्याचा  पोलीस यंत्रणा व महसूल विभाग शोध घेत आहेत.
जालना जिल्ह्यातील कृष्णा काशिनाथ गिरनारे (वय ३0 वर्ष)  हा भाविक सैलानी दग्र्यावर दर्शनासाठी आला होता. तो पत्न ीसोबत सैलानी ढासाळवाडी तलावात पोहण्यासाठी गेला असता  त्याने तलावात उडी मारल्यावर तो वर आलाच नाही, त्यामुळे या  घटनेची माहिती रायपूर पोलीस स्टेशनला दिली. यावरून त्याचा  शोध घेण्यासाठी बुलडाणा तहसीलदार सुरेश बगळे यांच्या  मार्गदर्शनाखाली बोटीसह शोधपथक नेमण्यात आले. यामध्ये  बुलडाणा नायब तहसीलदार गणेश माळी, जिल्हा आपत्ती  व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार, मंडळ अधिकारी विजय  मोरे, तलाठी गणेश वानखेडे, किशोर पाटील, कैलास राऊत,  प्रकाश उबरहंडे, अतुल झगरे, किशोर राऊत, हळदे यांचा  समावेश आहे. या तलावात एका वर्षामध्ये जवळपास १0 ते १२  भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रायपूर  पोलीस स्टेशनने वारंवार घाटनांद्रा ग्रामपंचायतला या तलावावर  येणार्‍या भाविकांकडे लक्ष देण्यासाठी उपाययोजना करण्याचे  सांगितले; परंतु अद्यापही संबंधितांनी याबाबत नियोजन करून  उपाययोजना केलेल्या नाहीत.

Web Title: two small brothers fall in the well, die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा