दोन सागवान तस्करांना अटक; वन विभागाची कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:17 AM2018-02-14T01:17:01+5:302018-02-14T01:18:54+5:30
बुलडाणा : शहराला लागून असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून अवैधरीत्या मौल्यवान सागाची झाडे तोडून त्याची तस्करी होत आहे. गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी अभयारण्यात सापळा रचून वन्य जीव विभागाने दोन तस्करांना ताब्यात घेतले; मात्र इतर पाच ते सहा जण फरार होण्यात यशस्वी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील चार तालुक्यात विस्तारीत ज्ञानगंगा अभयारण्य असून, त्याला लागून असलेले गावातील लोक अवैधरीत्या जंगलात शिरुन सागवानची झाडे तोडून तस्करी करीत आहेत. मंगळवारी बुलडाणा वन्य जीव विभागाचे आरएफओ मयूर सुरवसे यांना यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अभयारण्यातील तोफखाना बीटमध्ये तस्कारांचा घेराव करण्यात आला असता, त्यापैकी दोन तस्कर शेख हनिफ शेख भिका व शेख रहिम शेख रहेमान (दोघेही रा. इक्बाल नगर बुलडाणा) हाती लागले. तर इतर फरार झाले. त्यांच्याकडून पाच हजार रुपये किमतीचे सागवानच्या तोडलेल्या चार झाडांचे लाकूड आणि एक कुर्हाड जप्त करण्यात आली आहे. या भागात मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड करण्याचा या तस्करांचा इरादा होता, असे घटनास्थळावरील स्थितीवरून दिसून येते. या आरोपीविरोधात भारतीय वन अधिनियम १९२६ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत वन्य जीव विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.