स्कूल बस व प्रवासी वाहनाच्या धडकेत दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 13:32 IST2022-02-28T13:30:01+5:302022-02-28T13:32:02+5:30
Two students killed in school bus collision : दोन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

स्कूल बस व प्रवासी वाहनाच्या धडकेत दोन जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : स्थानिक अनुराधा इंग्लीश स्कूलच्या बस व प्रवासी अॅपेत भिषण अपघात झाला आहे. यामध्ये अॅपेतील दोन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २८ फेब्रुवारीच्या सकाळी १० वाजेच्या सुमारास चिखली- साकेगाव रोडवरील अनुराधा इंग्लीश स्कूलजवळ घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील अंत्री कोळी येथून सकाळी १० वाजेच्या सुमारास प्रवासी घेऊन चिखलीकडे येणाºया प्रवासी अॅपे व विद्यार्थ्यांना ने -आण करणारी अनुराधा इंग्रजी माध्यमाच्या शाळेची बस यांच्यात धडक बसल्याने भिषण अपघात झाला. या प्रवासी अॅपेत चालकासह चार जण होते. या अपघातात येथील आदर्श विद्यालयात शिकणारा अंत्री कोळी येथील १६ वर्षिय विद्यार्थी धनंजय अनिल वाघ व अन्य एका प्रवाश्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर गंभीर जखमींना येथील प्राथमिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर मृतकांना उत्तरीय तपासणीसाठी चिखली ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातील मृतक विद्यार्थी त्यांच्या आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा असल्याचे माहिती आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)