दोन हजार शेतकरी मदतीपासून वंचित!

By admin | Published: August 28, 2016 11:14 PM2016-08-28T23:14:02+5:302016-08-28T23:14:02+5:30

मेहकर तालुक्यातील दोन हजार शेतक-यांचे २ कोटी ६0 लाख रुपये थकले.

Two thousand farmers are deprived of help! | दोन हजार शेतकरी मदतीपासून वंचित!

दोन हजार शेतकरी मदतीपासून वंचित!

Next

उद्धव फंगाळ
मेहकर (जि. बुलडाणा),दि. २८: मागीलवर्षी पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे पिकांच्या उत् पादनात कमालीची घट झाली होती. तर बागायती फळबाग व बहुवार्षिक पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान गेल्या आठ महिन्यापासून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे २ कोटी ६३ लाख रु पये थकले असून २ हजार १0३ शेतकरी मदतीपासून वंचित असून शेतकर्‍यांना तात्काळ मदत न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरुपाची विविध आंदोलने करुन शासनाचा निषेध करण्यात येणार आहे.
गतवर्षी मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. यामुळे बागायती, फळबाग, बहुवार्षिक िपकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाचे वतीने ऑक्टोबर व नोव्हेंबर २0१५ मध्ये बागायती व बहुवार्षिक पिकांचाही सर्वे केला होता. यामध्ये १ हजार ७५२ हेक्टर क्षेत्रावरील बागायती व बहुवार्षिक पिकांचा सर्वे होऊन जवळपास २ हजार १0३ शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. यामध्ये सर्वेनुसार २ कोटी ६३ लाख ४९ हजार ६१५ रुपये आर्थिक मदत मेहकर तालुक्यातील बागाय ती व बहुवार्षिक शेतकर्‍यांना अपेक्षीत होती. तसा अहवाल मेहकर तहसील कार्यालयाकडून वरिष्ठांकडे डिसेंबर २0१५ मध्ये पाठविण्यात आला होता. परंतु गेल्या आठ महिन्यापासून हा अहवाल वरिष्ठ पा तळीवर धुळखात पडला आहे.

Web Title: Two thousand farmers are deprived of help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.