दोन हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:13 AM2017-08-11T01:13:24+5:302017-08-11T01:14:22+5:30
मेहकर: गेल्या काही वर्षांंमध्ये मेहकर तालुक्यावर दरवर्षी दुष्काळाचे सावट पसरत आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांचे सतत नुकसान होत आहे; परंतु शासनाने शेतकर्यांसाठी सुरू केलेल्या धडक सिंचन विहीर योजनेचा मेहकर तालुक्यातील ९0५ शेतकर्यांना लाभ मिळाला असून, जवळपास २ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: गेल्या काही वर्षांंमध्ये मेहकर तालुक्यावर दरवर्षी दुष्काळाचे सावट पसरत आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांचे सतत नुकसान होत आहे; परंतु शासनाने शेतकर्यांसाठी सुरू केलेल्या धडक सिंचन विहीर योजनेचा मेहकर तालुक्यातील ९0५ शेतकर्यांना लाभ मिळाला असून, जवळपास २ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.
गेल्या ५ ते ६ वर्षांंपासून मेहकर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. पाऊस कमी पडत असल्याने विहिरी, तलाव, धरण यांची पाण्याची पातळी खालावत आहे. उन्हाळ्यातसुद्धा ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण होते. तसेच पिण्याच्या पाण्याचीच टंचाई सर्वाधिक भासत आहे. तर पिकांना देण्यासाठी पाणी कसे मिळणार, शेतकर्यांना पिकांना पाणी देण्याची सोय व्हावी, पिकांचे उत्पन्न वाढून शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी शासनाने २0१२ साली धडक सिंचन विहीर योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत खर्या व पात्र लाभार्थींंना लाभ मिळावा, यासाठी खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांनी संबंधित अधिकार्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार संबंधित अधिकार्यांनी त्यावेळी ग्रामीण भागात सर्व्हे करून १ हजार ८४ शेतकर्यांची धडक सिंचन विहीर योजनेत निवड केली होती. त्यावेळी सदर विहीर बांधण्यासाठी शासनाकडून १ लाख रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये ५६५ शेतकर्यांनी विहीर पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर १ लाख रुपयात विहिरीचे बांधकाम होत नसल्याने जवळपास १00 विहिरी अर्धवट स्थितीत पडल्या होत्या. या १00 विहिरी नरेगात वर्ग करून पूर्ण करण्यात आल्या. तर २0१५ मध्ये अडीच लाख रुपये अनुदान देऊन १६ विहिरींचे काम पूर्ण करण्यात आले होते. तर उर्वरित २२४ विहिरींचे बांधकाम २0१६ ते जून २0१७ पर्यंंत पूर्ण करण्यात आले. खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी आर.पी. पवार, कृषी विस्तार अधिकारी ए.टी. मुळे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ९0५ विहिरी पूर्ण करून जवळपास दोन हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली आहे.