सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दोन अट्टल गुन्हेगारांना अटक
By Admin | Published: February 14, 2017 09:12 PM2017-02-14T21:12:40+5:302017-02-14T21:12:40+5:30
जिल्ह्यासह परजिल्ह्यात घरफोडी करणाºया दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
> ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 14 - जिल्ह्यासह परजिल्ह्यात घरफोडी करणाºया दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. यावेळी त्यांच्याकडून सोन्या -चांदीच्या दागीन्यासह लाखो रुपयाचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई १४ फेब्रुवारी रोजी संगम चौकात करण्यात आलीे. सदर आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची
पोलिस कोठडी सुनावलीे.
मागील काही दिवसापूर्वी शहरात दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करून सोन्या चांदीच्या दागीन्यासह लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला होता. प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. तर जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथे सुध्दा घरफोडी करण्यात आली होती. दरम्यान या घरफोडी प्रकरणातील आरोपी किशोर तेजराव वायाळ मेरा बुद्रूक व
लहू दगडू धंदरे रा. किनगाव जट्टू हे शहरातील संगम चौकात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने संगम चौकात सापळा रचला. काही वेळानंतर सदर आरोपी चौकात येताच त्यांना अटक
केली. त्यानंतर आरोपीची चौकशी केली असता त्यांनी १ लाख ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरल्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्याकडून सोन्या चादींच्या दागीन्यासह लाखो रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.