दोन वाहनांची समोरासमोर धडक; नऊ प्रवासी जखमी

By admin | Published: July 10, 2017 01:06 AM2017-07-10T01:06:42+5:302017-07-10T01:06:42+5:30

शारा (लोणार): इंडिगो व बोलेरो या दोन वाहनांच्या अमोरासमोर झालेल्या धडकेत नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.

Two vehicles hit face to face; Nine passengers injured | दोन वाहनांची समोरासमोर धडक; नऊ प्रवासी जखमी

दोन वाहनांची समोरासमोर धडक; नऊ प्रवासी जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शारा : येथून मेहकरकडे जाणाऱ्या एम.एच.२८ व्ही. ५९१० इंडिगोने, सुलतानपूरकडून लोणारला येणाऱ्या बोलेरो एम.एच.३७ जी. ५९५१ रा नावली ता. रिसोड हे शिर्डीवरुन आॅपरेशन करून लोणारमार्गे घराकडे नावली येथे जात असताना शारा येथे ९ जुलै रोजी समोरासमोर अपघात झाला. त्यात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.
बोलेरो गाडीतील गजानन राईतकर (वय ४५), शंकर नितनवरे (वय ६०), अनिल रईतकर (३५), गजानन धामणे (४०), पंकज काळे (२३), गणपत सुरुशे (६५), पंचफुलाबाई सुरुशे (६०) सर्व राहणार नावली. समाधान राऊत (२५) रा. अंजनी बु. यांना किरकोळ मार लागल्यामुळे उपचारासाठी लोणार येथे दवाखान्यात नेले.

Web Title: Two vehicles hit face to face; Nine passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.