जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे दोन बळी; बाधितांची संख्या २७१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:39 AM2021-02-20T05:39:04+5:302021-02-20T05:39:04+5:30

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा २७, कोलवड एक, सागवन एक, नांदुरा १९, काटी एक, पिंप्री आढाव दोन, सुटाळा बुद्रूक एक, टेंभुर्णा ...

Two victims of Corona again in the district; Number of victims 271 | जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे दोन बळी; बाधितांची संख्या २७१

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे दोन बळी; बाधितांची संख्या २७१

Next

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा २७, कोलवड एक, सागवन एक, नांदुरा १९, काटी एक, पिंप्री आढाव दोन, सुटाळा बुद्रूक एक, टेंभुर्णा एक, माक्ताेक, बोथाकाजी एक, खामगाव १७, शेगाव १९, जानोरी सहा, गायगाव पाच, सांगवा एक, पिंपळवाडी एक, मेहकर आठ, जानेफळ एक, डोणगाव एक, चिखली २७, कोलारा एक, पेठ एक, खैरव दोन, मंगरूळ नवघेर तीन, दहीगाव एक, टाकरखेड वायाळ एक, करवंड दोन, भरोसा एक, केळवद एक, देऊळगाव राजा १८, आळंद दोन, मेहुणा राजा एक, गारगुंडी एक, भिवगन दोन, नागणगाव एक, देऊळगाव मही एक, सिनगाव जहागीर १७, डोढ्रा दोन, पिंपळगाव देशमुख एक, झाडेगाव पाच, वडशिंगी एक, कुरणखेड दोन, जळगाव जमोद एक, सि. राजा चार, रुम्हणा दोन, जांभोरा दोन, दुसरबीड एक, सावळा एक, चिंचोली एक, साखरखेर्डा चार, आडगाव राजा एक, उमरगाव एक, मलकापूर १६, एकलारा एक, पळशी दोन, लोणार १७, सुलतानपूर एक, मोताळा तीन आणि अकोला जिल्ह्यातील अंदुरा येथील एक, जालना जिल्ह्यातील रफाळा येथील एक, परतूर येथील एक आणि जाफ्राबाद येथील दोन बाधितांचा यात समावेश आहे. यासोबतच चिखली येथील ५० वर्षीय व्यक्ती व बुलडाणा येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी एकूण ६६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यात मलकापूर कोविड केअर सेंटरमधून २१, लोणार चार, चिखली ११, देऊळगाव राजा पाच, जळगाव जामोद एक, खामगाव सहा, बुलडाणा १७, नांदुरा कोविड सेंटरमधील एकाचा यात समावेश आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एक लाख १८ हजार ३८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १४,३९५ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

१५१३ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा

तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या १,५१३ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा असून, जिल्हातील एकूण बाधितांची संख्या १५,६३० झाली आहे. त्यापैकी १,०५१ सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या १८३ झाली आहे.

Web Title: Two victims of Corona again in the district; Number of victims 271

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.