बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे दोन बळी, ५६७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:48 AM2021-03-17T11:48:19+5:302021-03-17T11:48:29+5:30
CoronaVirus News मंगळवारी पुन्हा जिल्ह्यात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २८३१ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी ५६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर २,२६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. दरम्यान, मंगळारी पुन्हा जिल्ह्यात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परिणामी एकूण मृतांची संख्या २२२ झाली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरातील ७१, करडी ४, सुंदरखेड ४, दुधा ८, धाड ६, चिखली ३२, खैरव २,, गांगलगाव ४, मोताळा ४, तारापूर ३, निपाणा ३, शेलगाव बाजार २, लोणार ३, सुलतानपूर ८, वानखेड ५, मनार्डी २, शेवगा २, हिंगणा ११, खामगाव १०८, लाखनवाडा २, सुटाळा ४, पिंप्री गवळी २, शेलोडी १४, हिवरा बु २, नांदुरा २३, शेंबा २, जवळा बाजार १, वळती १, पिंप्री अढाव १, पातोंडा १, निमगाव १, टाकरखेड २, खैरा १, निमखेड १, बरफगांव १, मलकापूर २३, दाताळा २, लोणवडी १, दे. राजा ४०, सिनगांव जहा. ५, डोढ्रा २, चिंचोली बुरुकुल १, सावंगी टेकाळे १, गिरोली १, पांग्री १, जळगांव जामोद ८, बोराळा बु ५, बोराळा खु. ४, कजेगांव ४, पळशी सुपो ७, सुनगाव १, मेहकर २५, नायगाव दत्तापूर ४, सावंगी माळी २, सारंगपूर ७, कनका १, पांग्री काटे १, मादनी १, महागाव १, अंजनी बु १, कळमेश्वर २, जानेफळ २, चिंचोली बोरे १, खळेगांव २, डोणगाव १, सिं. राजा १०, सावखेड तेजन १, आडगांव राजा ४, ताडेगांव १, साखरखेर्डा ८, उमरद २, दत्तापूर १, शेगांव ७, लासुरा १, जलंब १, पहुरजिरा १, वाशिम जिल्ह्यातील असोला १, जळगाव जिल्ह्यातील एकाचा यामध्ये समावेश.दरम्यान, चिखली येतील सिद्धार्थनगरमधील ६५ वर्षीय महिला आणि गोपालनगर खामगावमधील ७६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ५१४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी दिली.